शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश

By admin | Updated: December 18, 2014 00:36 IST

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्याच्या ...

गोसे (बुज.) : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्याच्या झालेल्या सभेमध्ये जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले तर जे शासनस्तरावरचे प्रश्न आहेत त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास अधिकाऱ्यांना निर्देश दिले.या सभेमध्ये गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे सयंोजक विलास भोंगाडे यांनी प्रत्येक गावठानात सामाजिक प्रार्थना स्थळाकरिता भुखंड उपलब्ध करुन दयावे, गावठानातील रस्ते खराब झाले ते दुरुस्त करुन दयावे, पोच मार्गाचे डामरीकरन करुन दयावे, व्यापार संकुल बांधुन दयावे, बेरोजगारांसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करुन दयावा, नौकरी ऐवजी एकमुस्त १५ लक्ष रुपये दयावे आदी मागण्या केल्या. वरिष्ठ नेते विठोबा समरीत युवा नेते सामेश्वर भुरे, धर्मराज भुरे, परशुराम समरीत आदीनी पाथरीच्या समस्या व राजेश्वर सामृतवार यांनी सावरगावच्या विनोद शेंडे यांनी सौंदडच्या समस्या मांडल्या, गुलाब मेश्राम यांनी इटीमीटी बांड करारनाम्याचे प्रश्न मांडले.जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी अधिकाऱ्याना प्रकल्पग्रस्तांना तातडीने पुनर्वसन पॅकेज वाटपाचे पैसे वाटपाचे निर्देश देवून जे वादातील प्रकरणे आहेत. त्याची सुनावणी घेण्यास सांगितले. स्पर्धा मार्गदर्शन वर्गात प्रकल्पग्रस्तांत मार्गदर्शन करण्याचे, संगम पोच रस्ता तयार करण्याचे, बेरोडी मधील भुखंड वाटप करण्याचे, गावठानातील भुखंडावरुन गेलेल्या विद्युत तारा काढण्याचे पाथरी सह अन्य गावातील प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच नोकरीऐवजी १५ लक्ष रुपयाच्या पॅकेजच्या धरणातील पाण्याच्या विक्रीच्या नफयातील ७५ टक्के रक्कम प्रकल्पग्रस्तांसाठी खर्च करावी, आदी मागण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश देवून प्रकल्पग्रस्तांची पुढील सभा वाही विश्रामगृह येथे घेण्यासा सांगितले.या सभेला जिल्हापुनर्वसन अधिकारी विजया बनकर, भुअर्जन अधिकारी जोशी विशेष भुअर्जन अधिकारी धार्मिक, गोसीखुर्द धरणाचे कार्यकारी अभियंता वर्धने, उपकार्यकारी अभियंता भाटीया आदी विविध अधिकाऱ्यासह प्रकल्पग्रसत उपस्थित होते. (वार्ताहर)