शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

भंडाऱ्यात नांदतो सर्वधर्मियांचा एकोपा

By admin | Updated: September 2, 2015 00:20 IST

भारतात सर्वधर्मिय वास्तव्य करतात. अपवादात्मक घटना वगळता सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहत असल्याने जगाच्या पाठीवर विविध संस्कृती भारतात बघायला मिळतात

जनगणना २०११ नुसार हिंदू १० लाख, बौध्द १.५ लाख, मुस्लीम २६ हजारांच्या घरातदर १० वर्षांनी होते जनगणनाभंडारा : भारतात सर्वधर्मिय वास्तव्य करतात. अपवादात्मक घटना वगळता सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहत असल्याने जगाच्या पाठीवर विविध संस्कृती भारतात बघायला मिळतात. भंडारा जिल्ह्यातही १० लाखांवर हिंदू बांधव वास्तव्य करीत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बौध्द बांधवांची संख्या येत असून मुस्लीम बांधवांची संख्या २६ हजारांच्या तर अन्य अल्पसंख्यांक समाजातील ख्रिश्चन, जैन व अन्य बांधवांचेही येथे वास्तव्य आहे.दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचे काम सुरू असताना विविध संघटना तसेच सामाजिक संस्थांनी नागरिकांना जातीचा उल्लेख करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर जनगणना प्रगणकाकडे जातीचा उल्लेख करून माहिती भरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने हा डाटा तयार केला आहे. शहरातील चमक-धमक म्हणा किंवा रोजीरोटीची साधने, मात्र ग्रामीण जनता शहराकडे ओढली जात आहे. हेच कारण आहे की, ग्रामीण क्षेत्रात जेथे लोकसंख्या वाढ फक्त ४.२१ टक्के झाली, तिथेच शहरी क्षेत्रात ५७.५२ टक्के वाढ झाली आहे. ही नोंद जिल्ह्यात सन २००१ व सन २०११ या दशकाच्या जनगणनेत करण्यात आली आहे. धर्मनिहाय बघितल्यास ग्रामीण क्षेत्रात मुस्लीम, शिख, जैन, बौद्ध व अन्य धर्मियांत चांगलीच घट झाल्याचे दिसते. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ३३४ नोंदविण्यात आली आहे. यात ९ लाख ६६ हजार ५०३ लोक ग्रामीण तर दोन लाख ३३ हजार ८३१ लोक शहरी क्षेत्रात असल्याचे नोंद आहे. यात ६ लाख ५ हजार ५२० पुरुष तर ५ लाख ९४ हजार ८१४ महिलांचा समावेश आहे. यातील ४ लाख ८७ हजार ४८४ ग्रामीण भागात पुरुष तर ४ लाख ७९ हजार ०१९ महिलांचे वास्तव्य आहे. शहरी भागात १ लाख १८ हजार ०३६ पुरुष तर १ लाख १५ हजार ७९५ महिला वास्तव्यास आहे.जिल्ह्यात हिंदू बांधवांची १० लाख ९ हजार ३५२ लोकसंख्या असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बौध्द बांधव असून त्यांची संख्या १ लाख ५४ हजार ४५८ इतकी नोंदविण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम बांधव असून त्यांची लोकसंख्या २६ हजार ५०२, ख्रिश्चन बांधवाची संख्या २ हजार १४५ तर शिख बांधवाची संख्या ८३१ तर जैन धर्मिय बांधवांची संख्या १०१७ असल्याची नोंद २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनगणनेदरम्यान २ हजार ४७४ लोकांनी धर्म सांगितलेला नाही. त्यात ५३० शहरी तर १९४४ ग्रामीण क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यात एक हजार २९६ पुरूष व १ हजार १७८ महिलांनी आपला धर्म सांगीतलेला नाही. यासोबतच तीन हजार ५५५ नागरिकांचा जातीधर्माबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे. यातील ५६२ शहरी भागातील नागरिकांचा तर २९९३ ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. यात १ हजार ७९० पुरुष तर १ हजार ७६५ महिलांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)शिख व जैन समाज कमीभंडारा जिल्ह्यात शिख व जैन धर्म अत्यंत कमी आहे. जिल्ह्यात शिख धर्मीय केवळ ८३१ व जैनधर्मीय १०१७ असल्याची नोंद आहे. भंडारा तालुक्यात सर्वाधिक ४०२ तर तुमसर तालुक्यात २३८ व साकोली येथे १३७ जैन बांधवांची नोंद करण्यात आली असून अन्य तालुक्यांत हा आकडा १०० पेक्षा कमी आहे. याच प्रकारे शिख धर्मिय भंडारा येथे २९२ तर पवनी येथे १७७ असून अन्य तालुक्यात त्यांची लोकसंख्या १०० पेक्षा कमी असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. विकास यंत्रणा विभागाने शासनाला सादर केला आहे. विविध जाती धर्माचे नागरिकांच्या भंडारा जिल्ह्यात सर्वधर्मियांचा एकोपा कायम आहे.