शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 25 आधारभूत धान खरेदी केंद्रांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

शासनाने वाढवून दिलेल्या धान खरेदीची मर्यादेचा फायदा घेत व्यापाऱ्यांचाच धान खरेदी करण्याचा प्रकार उघकीस आला. त्यावर खासदार सुनील मेंढे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ८ जुलै रोजी दिले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश निर्गमित करून धान खरेदी केंद्रांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवघ्या सहा तासांत ६ लाख ४१ हजार क्विंटल धान खरेदीचा ‘विक्रम’  करणाऱ्या जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्राची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील २५ केंद्रांची चौकशी करण्यासाठी पथक गठित करण्यात आले असून यात नागपूर आणि वर्धा येथील महसूल अधिकारी आहेत. या चौकशीने धान खरेदी घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.शासनाने वाढवून दिलेल्या धान खरेदीची मर्यादेचा फायदा घेत व्यापाऱ्यांचाच धान खरेदी करण्याचा प्रकार उघकीस आला. त्यावर खासदार सुनील मेंढे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ८ जुलै रोजी दिले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश निर्गमित करून धान खरेदी केंद्रांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यात वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत स्थानिक २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली. आता या धान खरेदीतील घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. आता चौकशी अहवाल कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या केंद्रांची होणार तपासणी- भंडारा तालुक्यातील पहेला, बेलगाव, खुटसावरी, तुमसर तालुक्यातील रूपेरा, लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला, विरली बुज., सोनी, पिंपळगाव (को), लाखांदूर, डोकेसरांडी, लाखनी तालुक्यातील लाखनी, राजेगाव, पिंपळगाव, पवनी तालुक्यातील ब्रम्ही, कातुर्ली, धामणी, सावरला,  साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा, वलमाझरी, साकोली, जांभळी (स), एकोडी, रेंगेपार, बांपेवाडा आणि घानोड या केंद्राचा समावेश आहे.  अधिकारी या केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून अहवाल प्रशासनाला सादर करणार आहेत.हे अधिकारी करणार तपासणी- वर्धा येथील उपजिल्हाधिकारी खैरनार, उमरेडचे उपविभागीय अधिकारी खंडाईत, रामटेकचे तहसीलदार म्हस्के, भिवापूरचे तहसीलदार कांबळे, वर्धाचे तहसीलदार लोखंडे, कावळे, कुहीचे नायब तहसीलदार पागोटे, पारशिवणीचे नायब तहसीलदार दुसावार, वर्धाचे नायब तहसीलदार दिगलवार, वर्धाच्या नायब तहसीलदार जाधवर, गुजर तपासणी करणार आहेत. त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील २२ अधिकारी राहणार आहेत.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड