शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

वेतन पथक अधीक्षकांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:22 IST

राज्यातील १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन व इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांना निवेदन : खासगी प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनाशिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन व इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यात उपसंचालक सरीश मेंढे यांना निवेदन देत सदर प्रकरणात वेतन पथक अधीक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी केली.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांचे वेतन काढू नये अशा सूचना निलेश वाघमारे यांनी मे २०१९ चे वेतनदेयक स्विकारतांना पत्र २९ एप्रिल २०१९ अन्वये निर्गमित केलेल्या होत्या. खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने ३० एप्रिल २०१९ ला याबाबत शिक्षण उपसचिव, आयुक्त शिक्षण व शिक्षक उपसंचालक, नागपूर यांना आंदोलनाची सुचना पाठविली होती. शिक्षण उपसंचालक यांनी मे २०१९ मध्ये शिक्षणसंचालक यांना निवेदन पाठविले. निलेश वाघमारे यांनी मुख्याध्यापकांना सूचना निर्गमित करताना शासन निर्णय २४ आॅगस्ट २०१८ नुसार वेतन काढू नये. या सूचना वेतन पथकाच्या ३ मेच्या पत्रातुन वगळल्या. मुख्याधापकांना वारंवार पगार बिल बदलावे लागले, त्यामुळे शिक्षकांना आर्थिक भार आणि मानसिक तणाव सहन करावा लागला. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मे महिन्याचे वेतन देयकातुन टीईटी पात्रता धारण न केलेल्या शिक्षकांची नावे वगळावी अश्या सूचना निर्गमित झालेली नसतानाही निलेश वाघमारे यांच्याकडून वारंवार चुकीच्या सूचना निर्गमित केल्या. युनियन बॅक अधिकारी पाटील यांना शिक्षकांची नावे व शाळा कोड सांगून बँकेत दुरध्वनीने संपर्क करून नावे वगळण्याबाबत कळविले त्यामुळे खाज.प्राथ.शिक्षक संघाने शिक्षण आयुक्त व उपसचिव शालेय शिक्षण यांचेकडे निलेश वाघमारे यांच्याकडून वेतन पथक अधिक्षकाचा अतिरिक्त कार्यभार काढावा करावा, अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने ६ मेच्या शिक्षण उपसंचालक, यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनातील निवेदनात केलेली आहे. दरम्यान अवर सचिव, शालेय शिक्षण विभाग यांनी, टीईटी पात्रता धारण न करणाºया शिक्षकांचे वेतन थांबवू नये अश्या सूचना ७ मे अन्वये निर्गमित केलेल्या आहेत. खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने या आंदोलनात महावीर मारवाडी उच्च प्राथमिक शाळा गोंदिया येथील चार शिक्षकांची शालार्थ आय डी प्रकरणे, थकबाकीची ३१ मार्च मंजुर देयके वेतनपथक कार्यालयाने बॅकेत न पाठविली नाही.सदर प्रकरणात अधीक्षकांची चौकशी करावी, चौकशीत दोषी आढळल्यास निलंबित करावे, सातव्या वेतन आयोगातील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील फरकाची देयके शाळांनी ३१ मार्च पुर्वी जमा केली ती मंजुर करावी, डॉ.शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्य.) चौकशी विभागिय सचिव रविकांत देशपांडे यांना तक्रारीतील कागदपत्रे पुरवित नाही त्यामुळे त्यांना निलंबित करणे, उच्चमाध्यमिक नागपुर विभागातील २६ शालार्थ आय डी प्रकरणांना मान्यता देणे, मनपा नागपूर अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी यांची ४२ महीण्यांच्या थकबाकीची देयकास तातडीने मंजुरी प्रदान करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन शिक्षण आयुक्त व उपसचिवांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनात आमदार नागो गाणार, प्रमोद रेवतकर, रहमतुल्लाह खान, ज्ञानेश्वर वाघ, गोपाल मुºहेकर, संजय बोरगावकर, मोहन सोमकुअर, अभिषेक अग्रवाल, लोकपाल चापले, चंद्रप्रभा चोपकर, मारोती देशमुख, शिवदास भालाधरे, राजकुमार शेंडे भंडारा जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण जिल्हा सचिव विलास खोब्रागडे व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक