शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

संवाद यात्रेमधून मिळेल शेतकऱ्यांना माहिती

By admin | Updated: May 27, 2017 00:28 IST

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून...

राजकुमार बडोले : भाजपची शिवार संवाद यात्रा सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून गुरूवार २५ मेपासून संपूर्ण राज्यात शिवार संवाद यात्रा सुरू होत आहे. या अंतर्गत २५ ते २८ मे दरम्यान जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनीधी या यात्रेत सहभागी होवून शेतातील बांद्यांवर जावून शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधणार आहेत. त्यांना सरकारने केलेल्या कामांची व योजनांची माहिती देवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची ही यात्रा असून सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी नियोजनानुसार कार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. मंगळवारी २३ मे रोजी शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या प्रमुख पदाधिकाधिऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. बैठकीत प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, नगरसेवक भरत क्षित्रय, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, २५ ते २८ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात शिवार संवाद यात्रेतून शेतकीऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. पुढील १५ दिवसांत पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्य विस्तारक योजनेंतर्गत प्रत्येक बुथवर जावून घरोघरी भेटी देण्याचे कार्यक्रम, भाजपा आजीवन सहयोग निधी आदी कार्यक्रम नियोजनानुसार करण्याचे सांगितले. याप्रसंगी माजी आमदार केशवराव मानकर व संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच आजीवन सहयोग निधीबाबत नगरसेवक भरत क्षत्रिय व दिनेश दादरीवाल यांनी माहिती दिली. नुकत्याच पार पडलेल्या गोरेगाव व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाकरिता जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, मंडळ अध्यक्ष लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे यांचे ना. बडोले यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केले. या वेळी बैठकीत मंडळ अध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर, लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे, प्रमोद संगीडवार, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, विजय बिसेन, परसराम फुंडे, धनेंद्र अटरे, मुन्ना शर्मा, नरेंद्र बाजपेयी, खेमराज लिल्हारे, प्रविण दहीकर, देवेंद्र टेंभरे, पवन अग्रवाल, आत्माराम दसरे, सुरेश पटले, महेंद्र बघेले आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्र्यांचा दौरा पालकंमत्री राजकुमार बडोले हे २५ मेपासून शिवार संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे २५ मे रोजी अर्जुनी-मोर तालुक्यातील रांझीटोला येथे सकाळी ११ वाजता, येनोडी-जांभळी येथे दुपारी १२ वाजता , दुपारी १ वाजता धाबेपवनी येथे तर २ वाजता पांढरवाणी-रयत येथे उपस्थित झाले. त्याचबरोबर सडक अर्जुनी तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार असून येथील कोसमघाट येथे दुपारी ३ वाजता, खोडशिवनी येथे ४ वाजता तर डव्वा येथे पाच वाजता उपस्थित राहून शेतकीयांशी सवांद साधला. तर शुक्रवारी २६ मे रोजी आमगाव -देवरी विधान सभा क्षेत्राचा दौरा करणार असून सकाळी ११.३० वाजता साखरीटोला ( तिरखेडी) येथील पुलाचे लोकार्पण, दुपारी १२ .३० वाजता सलंगटोला शेतशिवार संवाद तर सायंकाळी ५ वाजता गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा येथे शेत शिवार संवादातून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.