शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पट्टा पद्धत लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST

भंडारा तालुक्याअंतर्गत दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पट्टा पद्धतीची लागवड झाली आहे. तालुक्यातील परसोडी ५० हेक्टर, खमारी ७५ हेक्टर, माटोरा २६ हेक्टर, आमगाव ३३ हेक्टर, टेकेपार २३ हेक्टर, गणेशपूर १३ हेक्टर, भंडारा १९ हेक्टर, कोंढी २७ हेक्टर, साहुली १३ हेक्टर, शहापूर २७ हेक्टर, मोहदूरा २३ हेक्टर, जाख ३२ हेक्टर, भिलेवाडा २३ हेक्टर, कोथुर्णा मुख्यालयात २९ हेक्टर क्षेत्रात धान लागवड झाली आहे.

ठळक मुद्देभंडारा तालुक्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड, कीडरोग नियंत्रणासाठी ठरतेय फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पट्टा पद्धतीने धान लागवड पद्धतीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल यावर्षी वाढला आहे. सुधारित व तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास कमी खर्चा भरघोस उत्पादन मिळते ही बाब हेरून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे.भंडारा तालुक्याअंतर्गत दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पट्टा पद्धतीची लागवड झाली आहे. तालुक्यातील परसोडी ५० हेक्टर, खमारी ७५ हेक्टर, माटोरा २६ हेक्टर, आमगाव ३३ हेक्टर, टेकेपार २३ हेक्टर, गणेशपूर १३ हेक्टर, भंडारा १९ हेक्टर, कोंढी २७ हेक्टर, साहुली १३ हेक्टर, शहापूर २७ हेक्टर, मोहदूरा २३ हेक्टर, जाख ३२ हेक्टर, भिलेवाडा २३ हेक्टर, कोथुर्णा मुख्यालयात २९ हेक्टर क्षेत्रात धान लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी पुढाकार घेत धान लागवडीसाठी मार्गदर्शन घेतले आहे.प्रत्यक्ष पीक लागवड करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दाखविल्याने पट्टापद्धत क्षेत्रात वाढ झाली आहे. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन रासायनिक खताचे योग्यवेळी मात्रा रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास फवारणी करणे तसेच मशागतीसाठी रोवणीच्या बांधीत काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरते, असे कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, योगेश वासनिक यांनी सांगितले. तालुक्यात सोयाबीनमध्ये यंदा वाढ झाली असून २२५ हे. क्षेत्रावर तर फळबाग लागवड ६० हे.क्षेत्रावर झाली असून शेतकरी आधुनिक पद्धतीकडे वळल्याचे दिसून येत आहे.असे आहेत फायदेपट्टा पद्धतीत १० ते १५ फुटावर एक ते दीड फुटाची लांब रेषेत जागा सोडली जाते. रोपांना अधिक फुटवे फुटतात. त्यामुळे तुडतुडे व अन्य रोगावर नियंत्रण आणता येते. पिकाच्या मुळापर्यत थेट सूर्य प्रकाश मिळत असल्याने हवा खेळती राहते. पिकाची पाहणी, विविध रोगाचे निरिक्षण करणे सोयीचे ठरते. भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याने पूर्व पश्चिम दिशेत पट्टा पद्धत फायदेशिर असल्याचे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती