शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

खरीप धानाच्या दरात प्रती क्विंटल ५३ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली आहे. धान हेच या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट होवू नये यासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते.

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये सुरू होणार धान खरेदी : दरवाढ तुटपुंजीच, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. २०२०-२१ च्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासकीय धान खरेदीचे दर शासनाने निश्चित केले आहे. अ दर्जाच्या धानाला १८८८ रुपये, तर सर्वसाधारण धानाला १८६८ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ धानाच्या दरात प्रति क्विंटल केवळ ५३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ फारच तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली आहे. धान हेच या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट होवू नये यासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. गत खरीप आणि रब्बी हंगामात मार्केटिंग फेडरेशनने ५७ लाख क्विंटल धान खरेदी खरेदी केली होती. गतवर्षी सर्वसाधारण धानाला १८१५ आणि अ दर्जाच्या धानाला १८३५ रुपये दर शासनाने जाहीर केला होता. तर यंदा सर्वसाधारण धानाला १८६८ आणि अ दर्जाच्या १८८८ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. मागील वर्षीच्या हमीभावाच्या तुलनेत यंदा सरासरी ५३ रुपये प्रति क्विंटल दरात वाढ झाली आहे. दरवर्षी धानाच्या एकरी लागवड खर्चात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना प्रति एकर धान लागवडीचा २५ ते ३० हजार रुपये येतो. तर खते, बियाणे आणि मजुरीच्या दरात वाढ होत आहे. पण त्यातुलनेत दर मिळत नाही.गतवर्षी महाविकास आघाडीने धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला होता. त्यामुळे शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला होता. २५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात शासकीय धान खरेदीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.मक्का खरेदीचा दर निश्चितजिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात मक्का लागवड केली जात आहे. मक्का उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासनाने मक्का हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. २०२०-२१ करिता मक्का खरेदीचे दर शासनाने निश्चित केले असून मक्याला १८५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.

टॅग्स :agricultureशेती