शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ, पाणी पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून प्रदूषणामुळे गढूळपणा वाढला आहे. तसेच ईकॉर्निया ही जलपर्नी वनस्पती आणि जलकिड्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देनागनदीचे सांडपाणी । निरी म्हणते, पाण्याच्या संपर्कातील व्यक्तींवरही परिणामाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातून वाहनाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीतून येणाऱ्या सांडपाण्यामुळे दूषीत झाले असून गोसेखुर्द धरणामुळे साठवलेल्या पाण्यात जलवनस्पती व जलकिड्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीच्या पाण्यात गढूळपणा मोठ्या प्रमाणात वाढला असून वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य नाही, असा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) ने दिला आहे. मात्र त्यानंतरही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेती, मनुष्य आणि जनावरांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून प्रदूषणामुळे गढूळपणा वाढला आहे. तसेच ईकॉर्निया ही जलपर्नी वनस्पती आणि जलकिड्याचे प्रमाण वाढले आहे. दूषीत पाण्यात जीवानुचे प्रमाणही धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यास अजिबात योग्य नाही, असा स्पष्ट अहवाल निरीने तयार केला आहे. निरीच्या वैज्ञानिकांनी जून २०१८ मध्ये गोसेखुर्द धरणाच्या परिसरातून नदीच्या पाण्याचे परीक्षण केले होते. त्यानुसार एकीकडे थांबलेल्या पाण्यावर ईकॉर्निया वनस्पतीचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले तर दुसरीकडे नागनदीही या प्रदूषणात वाढ करीत आहे.वैनगंगेच्या तिरावरील शेतामध्ये सिंचनासाठी पाणी वापरले जाते. परंतु हे पाणी पिकांसाठी आणि या पाण्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठीही धोकादायक होण्याची भीती आहे. नदीच्या पाण्यातील पीएचस्तर, आम्लता, अ‍ॅसिडीटीचास्तर सामान्य आहे. शिवाय कॅलशियम, मॅग्नेशियम, सोडीयम, पोटॅशियम आदी रासायनिकांचा स्तर सामान्य असून मॅग्निज वगळता जड धातूचे प्रमाणही नगन्य असल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये केला आहे. वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला दहा एनटीयु तर तळाशी १७ एनटीयु आहे. पाच एनटीयुचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी वैनगंगा बचाव अभियान नागरी समितीचे नितीन तुमाने यांनी पुढाकार घेतला आहे.निरीच्या सूचनाऑरगॅनिक प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रातील जलपर्नी वनस्पती काढणे गरजेचे आहे. पिण्यासाठी पाण्याचा वापर योग्य शुद्धीकरणानंतरच शक्य आहे. मॉयक्रोबिलियन प्रादूर्भावाचा धोका असल्याने सुरक्षित सिंचन प्रॅक्टीस आवश्यक आहे. नागनदीचे सांडपाणी वैनगंगेत सोडने, थांबविणे गरजेचे आहे.वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यासह पर्यावरण मंत्र्यांना पत्र देण्यात आले. परंतु समस्या कायम आहे. भंडारा जिल्ह्याचा हा वनवास केव्हा संपेल हा प्रश्न आहे.-मो.सईद शेख, संस्थापक अध्यक्ष, ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्था, भंडारा.

टॅग्स :riverनदी