बॉक्l
पंधरा दिवस लोटूनही कंत्राटदाराचे दुर्लक्ष कायम
पंधरा दिवस उलटूनही कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष कायम आहे. रस्ता खोदकामानंतर दुरुस्ती झालीच नाही. भंडारा शहरातील तुकडोजी वार्ड परिसरात पाईपलाईन कामासाठी वर्षभरापूर्वी खोदकाम करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे पुन्हा येथे रस्ता सपाटीकरण तसेच सिमेंट आच्छादनाचे काम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वॉर्डवासीयांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकर, पाणीपट्टी नियमित असतानाही सुविधा देण्यात भेदभाव का, असा सवाल नागरिक करत आहेत.
कोट
माझ्या घरासमोरील नाली पाण्याने तुंबली आहे. यासाठी मी नगरपरिषद प्रशासन, नगरसेवकांकडे विनंती केली आहे. मात्र, अद्याप नाल्यांची सफाई झाली नसल्याने येथे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रामू शेंडे,
नागरिक, तुकडोजी वाॅर्ड, भंडारा.
तुकडोजी वाॅर्डातील एलआयसी ऑफिस परिसरात विविध समस्या आहेत. यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेण्याची गरज आहे. नाली स्वच्छता, नालीवरील आच्छादने व रस्ता बांधकाम येथे त्वरित करण्याची गरज आहे.
ॲड. राजेश राऊत,
माजी नगरसेवक, भंडारा.