शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण ‘फूटवे ब्रीज’चा ग्रामस्थांना फटका

By admin | Updated: February 3, 2016 00:36 IST

तुमसर रेल्वे रोड येथून ग्रामस्थांना रेल्वे स्थानकाबाहेर जाण्याकरिता फुटवे (पादचारी) पूल नसल्याने वारंवार ...

ग्रामस्थांमध्ये असंतोष : शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांना भेटणारतुमसर : तुमसर रेल्वे रोड येथून ग्रामस्थांना रेल्वे स्थानकाबाहेर जाण्याकरिता फुटवे (पादचारी) पूल नसल्याने वारंवार त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करुन कारवाई करण्यात येते. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. १२ फेब्रुवारी रोजी रेल्वे महाव्यवस्थापकांना याबाबत ग्रामस्थ भेटून निवेदन देणार आहे. रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांचे दोन ते तीन मार्ग कायम बंद केल्याने त्यांच्यात रोष आहे.तुमसर रोड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. रेल्वे स्थानकामुळे गावाची विभागणी दोन भागात झाली आहे. रेल्वे स्थानकावर केवळ एकच फूटवे ब्रीज आहे. त्याचा उपयोग रेल्वे प्रवाशीच करतात. या फूटवेचे एक टोक रेल्वे स्थानकात तर दुसरे टोक रेल्वे स्थानकाबाहेर आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जाण्याकरिता गावाला विळखा घालून जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून हा काम सुरू आहे.रेल्वेने नियम अतिशय कडक केले आहे. रेल्वे स्थानकावर नियमानुसार प्रवेश करतांना तिकीट आवश्यक आहे. परंतु ग्रामस्थांना दररोज दिवसातून अनेकदा ये-जा करावे लागते. प्रत्येक वेळेस तिकीट खरेदी करावी काय? असा प्रश्न येथे उपस्थित होतो. रेल्वे प्रशासनाचे येथे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात रेल्वे समिती सदस्य आलमखान, प्रा. मोहन भोयर, संजय ताबी, देवसिंग सव्वालाखे, शैलेश ठाकरे, संजय केवट, धनंजय सिंग, अ‍ॅड. राजेश राहूल, सरपंच रिता मसरके, सुनिता बिरणवारे, चेनलाल मसरके, विरेंद्र दमाहे यांनी रेल्वे मंत्री, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. परंतु आश्वासनाव्यतिरिक्त त्यांना काहीच मिळाले नाही. येत्या १२ फेब्रुवारीला रेल्वे महाव्यवस्थापकांचा तुमसर रोड रेल्वे स्थानक येथे दौरा आहे. यावेळी शिष्टमंडळ भेटून पुन्हा निवेदन देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)