भंडारा : पोलीस अधीक्षकांच्या भरारी पथकाने बसस्थानकासमोरील एका लॉजवर धाड टाकून चार तरूण, तरूणींना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे लॉजसमोर बघ्यांची गर्दी झाली होती. शहरात काही लॉज अश्लील कृत्यासाठी कुप्रसिद्ध होत आहेत. गुरुवारी दुपारी दोन तरूण व दोन तरूणी या लॉजमध्ये आल्या. त्यांनी दोन वेगवेगळ्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. दरम्यान, या लॉजमध्ये गैरकृत्य सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यावरुन या पथकाने लॉजवर छापा टाकला. यावेळी हे चारही तरूण, तरूणी वेगवेगळ्या दोन खोलीमध्ये होते. दरवाजा खटकावल्यानंतर दार न उघडल्यामुळे पोलिसांनी धक्का मारुन दरवाजा उघडला असता या तरुण - तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांना आढळून आले. त्यानंतर या चारही तरुण तरुणींना ताब्यात घेऊन भंडारा पोलीस ठाण्यात नेले. तिथे पुढील कारवाई सुरू होती. अचानक झालेल्या कारवाईमुळे लॉज परिसरात खळबळ उडाली होती. लॉजसमोर बघ्यांची गर्दी झाली होती. सदर तरूण, तरूणी १८ ते २१ या वयोगटातील आहेत.
यातील एक तरुण तरुणी मोहाडी तालुक्यातील तर दुसरे साकोली तालुक्यातील आहेत. हे चारही जण आज झालेल्या परिक्षेसाठी भंडार्यात आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलाविण्यात आले. त्यांच्यासमोर समज देऊन सोडण्यात आले. खोलीमध्ये आक्षेपार्ह साहित्य छापा घातलेल्या पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, या लॉजवर आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. त्याठिकाणी आठ ते दहा कंडोम आढळून आले. त्यामुळे दिवसभरात त्या लॉजमध्ये येणार्यांचे प्रमाण किती असावे, याचा अंदाज येऊ शकतो. (प्रतिनिधी) लॉज मालकाविरुद्ध कारवाईची मागणी शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दोन लॉजमध्ये अश्लील कृत्य नेहमी सुरू असतात. याची माहिती पोलिसांना असूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
आजच्या या घटनेत या तरुण-तरुणींनी भाऊ बहिण असल्याचे सांगून खोली मागितल्याचे खोली देणार्याचे म्हणणे आहे. परंतु, त्यांच्याकडून ओळखपत्र न मागता त्यांना खोली दिली कशी? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या कारवाईत पोलिसांनी समज देऊन या तरुण-तरुणींना सोडून दिले असले तरी या गैरकृत्याला जबाबदार असलेल्या लॉज मालकाविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. याशिवाय त्याच परिसरातील आणखी एका लॉजमध्ये असा प्रकार सुरू असल्याचे परिसरातील दुकानदारांनी सांगितले असून हे लॉज बंद करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.