शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सिग्नल नावापुरतेच, यंत्रणेला लागली अखेरची घरघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्नल व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. 

संतोष जाधवर लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी भंडारा शहरातही सिग्नल व्यवस्था उभारली आहे. मात्र, हे सिग्नल केवळ नावालाच दिसून येत आहेत. भंडारा शहरातील नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, गांधी चौकात  सिग्नल यंत्रणा उभारली आहे. मात्र, हे सिग्नल अजूनही सुरू झालेले नाहीत. शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्नल व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. वाहतूक पोलीस आपली महत्त्वाची भूमिका बजावितात. पण, सिग्नल व्यवस्था केवळ शोभेपुरतीच उरली असून, अजूनतरी धूळखात पडली आहे.

जिल्हा परिषद चौक

शहराचा वाढता विस्तार पाहता भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे येथे कार्यरत वाहतूक पोलिसांनाही अनेकदा चांगलीच कसरत करावी लागते. शिवाय, एखाद्या वाहनधारकावर कारवाई करत असताना दुसरे वाहनधारक अतिवेगाने धूम ठोकतात. यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक येथील सिग्नल यंत्रणा लवकर सुरू करण्याची गरज आहे. 

त्रिमूर्ती चौक 

संपूर्ण जिल्ह्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असलेला त्रिमूर्ती चौक भंडारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातच भंडारा पंचायत समितीसमोरील अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग व त्रिमूर्ती चौकातील रस्त्यालगत फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पाहता येथे भंडारा नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय, या महत्त्वाच्या चौकातील सिग्नल बंद दिसत आहे. 

ना सिग्नल, ना वाहतूक पोलीस भंडारा शहरातील आरटीओ कार्यालयासमोरच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. मात्र, याठिकाणी ना सिग्नल दिसतात, ना वाहतूक पोलीस. येथे अनेकदा बीटीबीकडे जाणारी-येणारी वाहने व महामार्गावरील अतिवेगाने येणारी वाहने यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. हीच अवस्था भंडारा तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर दिसून येत आहे. थेट रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात.

नियम तोडू नका, वाहतूक पाेलीस पाहताेय

१ भंडारा शहरातील सिग्नल सुरु नसले तरी शहरातील विविध चौकात वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट कारवाई केली जाते. अतीवेगाने पाेलिसांची नजर चुकवून गेले तरी पाेलीस गाडीचा फाेटाे काढून कारवाई करतात.२ शहरातील सिग्नल सुरू झाले पाहिजे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका, राजीव गांधी, खाम तलाव चौकातील वाहतुकीची समस्या सुटू शकेल. यामुळे वाहतूक पाेलिसांनाही दिलासा मिळेल.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी