शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी न होताच मध्यप्रदेशातील दुधाची तुमसर तालुक्यात आयात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:55 IST

कुणाचा आशीर्वाद ? : गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह, केवळ आकस्मिक तपासणी

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : परराज्यातून अन्य जिल्ह्यात दुधाची आयात करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद आवश्यक असते. मागील काही वर्षांपासून मध्य प्रदेशातील दुधाची तुमसर तालुक्यात आयात सुरू आहे. लगतच्या राज्यामधून येणाऱ्या या दुधाची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विनातपासणी आयात होणाऱ्या या दुधाच्या गुणवत्तेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुमसर तालुक्याची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. दररोज तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून दूध आयात होत आहे. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा हे दूध राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे पाठविले जाते. दर दिवशी तुमसर तालुक्यातून नागपूर येथे सुमारे एक लाख लिटर दूध विक्रीकरिता पाठविले जाते. 

मध्य प्रदेशाच्या सीमेतील वाराशिवनी, कटंगी या परिसरातून हे दूध तुमसर तालुक्यात आयात होत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील या परिसरात दुधाळ जनावरांची संख्या कमी आहे. तसेच या परिसरातील दूध बालाघाट व शिवणी येथेही मोठ्या प्रमाणात जाते. त्यामुळे तुमसर तालुक्यात येणाऱ्या दुधावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

राजकीय आशीर्वाददूध व्यवसाय हा नगदी व्यवसाय मानला जातो. या व्यवसायात मागील अनेक वर्षापासून एका राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत न जाता संबंधित विभाग कागदोपत्री सर्व सोपस्कार पार पडतो काय, असा प्रश्न उपस्थित होतो. अलीकडे केमिकलयुक्त दूध बाजारात येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील वारासिवनी व कटंगी परिसरात दुधाळ जनावरांची संख्या कमी असतानाही तिथून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या दुधाबद्दल शंका उपस्थित होत आहे.

आंतरराज्य वाहतुकीला परवानगी आहे का? दूध हे नाशवंत पेय असून, खाद्यपदार्थात मोडतो. खाद्यपदार्थाची आंतरराज्यीय वाहतूक करताना यासाठी परवानगी आहे का, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दुधाची गुणवत्तेची तपासणी नियमित न होणे, हे आश्चर्य आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे या प्रकाराकडे अद्याप लक्ष गेलेले दिसत नाही.

"दोन राज्यांमधून दुधाची वाहतूक होत असेल तर परवानगीची गरज नाही. मात्र टँकरमधून आलेल्या दुधाची तपासणी केली जाते. त्याची गुणवत्ता तपासली जाते. आम्ही नियमित तपासणी करत नसलो तरी करताना आकस्मिक तपासणी करीत असतो." - प्रशांत देशमुख, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडारा