शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

सावित्रीबार्इंचे विचार आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:11 IST

मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे.

ठळक मुद्देराहुल डोंगरे यांचे प्रतिपादन: बोरी येथे समाजप्रबोधन कार्यक्रम

आॅनलाईन लोकमततुमसर : मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. हे आपल्या समाजाचे दु:ख आहे. तेव्हा अज्ञान न स्वीकारता विज्ञान स्वीकारावे. भारतीय स्त्रियांचा श्वास सावित्रीबाई ज्योतिबा फुले आहेत. मृतवत झालेल्या भारतीय स्त्रियाला नवसंजीवनी दिली. भारतीय स्त्रियांना सन्मान दिला. सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येकानी आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती बोरीच्या वतीने आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सचिव बेरूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती कविता बनकर, माजी सभापती कुसुम कांबळे, सरपंच अविनाश उपरीकर, उपसरपंच अरविंद भेदे, माजी सरपंच नामदेव कांबळे, माजी सरपंच भाऊराव उपरीकर, सुगंधा राहूल डोंगरे, माजी सरपंच सुरेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्या अनिता कांबळे, लता कांबळे, रेशमा बोरकर, निशा धावडे, तंटामुक्ती अध्यक्ष रोशनलाल कांबळे, ललिता उपरीकर, सेवक उपरीकर, हसेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.राहूल डोंगरे म्हणाले, भारतात फुले दाम्पत्य जन्मास आले नसते तर शिक्षणाची गंगा समाजातील खालच्या वर्गापर्यंत पोहचली नसती आणि भारतीय समाजातील स्त्रीयांचे विश्व चूल आणि मूल एवढेच सीमित असते. पण आमच्या समाजातील स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील योगदानाची माहिती नाही. मोठ्या पदावर गेलेल्या व पगार घेणाºया भगिनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. देशाला आज सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गरज निर्माण झाली आहे.प्रास्ताविक सरपंच अविनाश उपरीकर यांनी केले. गावाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे, असे आवर्जून सांगितले. प्रा. सचिन वेरूळकर यांनी स्पर्धेच्या जगात टिकाव धरण्यासाठी आत्मविश्वास व चिकाटी हे गुण आत्मसात करा, असा संदेश देवून ध्येयाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला. १० वी व १२ वीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.हभप हिराजी पंचबुधे महाराज व हभप विक्की चन्ने महाराज धापेवाडा यांनी किर्तनातून समाजप्रबोधन केले. संचालन व आभार प्रदर्शन उत्तम नगरधने यांनी केले. कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती, देवस्थान पंचकमेटी, ग्रा.पं. कमेटी जि.प. पूर्व माध्य शाळा, महात्मा ज्योतिबा फुले क्रिडामंडळ, पुरूष बचत गट, महिला बचत गट बोरी वासियांनी अथक परिश्रम घेतले.