शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दारूच्या अवैध विक्रीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देलाखनी तालुक्यातील प्रकार : राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील लाखनी व पालांदुर पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या मौजा केसल वाडा (पवार), पोहरा, केसलवाडा (वाघ), सालेभाटा, पिंपळगाव, मुंडीपार, तई, मुरमाडी (तुप.), खराशी, खुणारी पळसगाव, कोलारी, पालांदूर परिसर घोडेझरी, रामपुरी, गुरढा, भुगाव या ग्रामीण भागासह स्थानिक पालांदूरात सुद्धा देशी दारू पासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित वेळेत सर्रास मिळत आहे.या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.भर चौकात दारुची होते विक्रीअवैध दारु विक्रीचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा? असा सवाल ग्रामवासीयांतर्फे विचारला जात आहे. पालांदूरात प्रवेश करताना तीनही रस्त्यांवर सरकारमान्य देशी दारूची दुकाने दिसून येतात.यात काही दुकानांतून पालांदूर व परिसरातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांना एका मर्जीतल्या व्यक्तीकडून दुचाकीद्वारे दिवसाढवळ्या व रात्रीला भर चौकातूनच दारूचा पुरवठा केला जातो हे विशेष.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा