शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नरव्हा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झाला होता. त्यानंतरही वाहतूक सुरुच आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची होते झोपमोड : रस्त्याची दूरवस्था, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील नरव्हा रेती घाटावर ट्रॅक्टरच्या आधाराने रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. रेती उपसा बंद करावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा नरव्हा वासियांनी प्रशासनाला दिला आहे.दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झाला होता. त्यानंतरही वाहतूक सुरुच आहे.मुरमाडी व पालांदूर परीसरातील रेती तस्कर पूर ओसल्यापासून नरव्हा , मऱ्हेगाव पाथरी, पळसगाव, दिघोरी घाटावर सक्रिय झालेले आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या रेती वाहनाने गावकऱ्यांची झोप कठीण झाली आहे. रेती तस्करांची संबंध लांब पर्यंत असल्याने प्रशासन सुद्धा त्यांचे वर कारवाई करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत.दिवसभर होत असलेली रेती वाहतूक ही चिंतेची बाब असून उन्हाळ्यामध्ये काठावरील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात आलेल्या पुराने नदीपात्र रेतीने भरून होते. मात्र रेती तस्करांनी अवैध रेती वहन मोठ्या प्रमाणात चालविल्याने आतापासूनच नदीपात्र मोकळे होत आहेत. कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, खनिकर्म विभाग आदींनी वेळीच लक्ष घालत अवैध रेतीला प्रतिबंध घालावा अशी मागणी नदी तीरावरील गावकऱ्यांनी केलेली आहे.जिल्ह्यात अजून तरी रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. तेव्हा शासनाच्या वतीने पुढाकार घेत पर्यावरण विभागाची परवानगी घेत तात्काळ नदीकाठावरील गावकऱ्यांना विश्वासात घेत नदीघाट लिलावात काढावे अशी मागणी होत आहे. काही हिस्सा गावच्या सुधारणेसाठी देत गावातील रस्त्याची दुरावस्था सुधारावे, पिण्याच्या पाण्याकरिता विशेष व्यवस्था म्हणून शक्य ते प्रयत्न करीत नदीकाठावरील नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी