शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:20 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाच्या हद्दीत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देमौल्यवान वृक्ष असुरक्षित : इमारती कोसळण्याच्या मार्गावर

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाच्या हद्दीत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. या विश्रामगृहाच्या शेजारी असणारे सागवनाचे मौल्यवान वृक्ष असुरक्षित आहेत. विश्रामगृहाचा कायापालट करण्याची मागणी होत आहे.तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या पाठबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची जीर्ण झालेली अवस्था धोकादायक झाली आहे. या विश्रामगृहाचे आवाराला असणारे तारेचे सुरक्षा कवच पुर्णत: तुटले आहे. यामुळे विश्रामगृहाचे जागेतून रहदारी वाढली आहे. याच विश्रामगृहाचे आवारता सागवनाचे मौल्यवान वृक्ष आहेत. ही वृक्ष आता सुरक्षीत नाही. विश्रामगृहाचे स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. या विश्रामगृहात तिन इमारती आहे. या इमारती भंगारावस्थेत आहेत. विश्रामगृहात यंदा शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे यत्रणेमार्फत दोन बैठकी घेण्यात आलेल्या आहेत. चांदपूर जलाशयाचे सिंचनासाठी देण्यात येणाºया पाणी वाटपाचे प्रश्नावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कार्यकारी अभियंता चोपडे यांनी हजेरी लावली आहे. विश्राम गृहाचे समस्या त्यांनी अनुभवल्या आहेत. बैठकीचे निमित्ताने वर्षातून एक किंवा दोनदा या विश्रामगृहात पाटबंधारे विभागाची यंत्रणा हजेरी लावत आहे. यानंतर कुणी ढुंकून ही पाहत नाही. विश्रामगृहाचे देखभाल व दुरुस्तीकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात येत नाही. अंदाजे अर्धा एकर जागेत असणाऱ्या या विश्रामगृहाचे शेजारी बगीचा तथा कायापालट करण्याचे ओरड आहे.विश्रामगृहाचे संदर्भात यंत्रणा सकारात्मक निर्णय घेत आहे. पंरतु शासन स्तरावर निधी उपलब्ध करण्यात येत नाही. याआधी विश्रामगृहाची सुरक्षा व स्वच्छता करण्यासाठी मजुर कामावर ठेवण्यात येत होते. पंरतु पाठबंधारे विभागात कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. रिक्त पदावर नियुक्त्या अडल्या असल्याने मनुष्य विरहीत विभागाकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे. या विभागात पदे रिक्त असल्याने विश्रामगृहात कर्मचाºयांची नियुक्ती बंद करण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासन या विश्रामगृहाचे पुर्नजिवीत कडे गंभीर नाही. या राज्य मार्गावरुन शासनाची यंत्रणा धावत आहे. पंरतु विश्रामगृहाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाची मालमत्ता असून रनेरा गावात ही आहे.