शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशानंतर खबरदारी घेतल्यास वाचू शकतो जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:39 IST

पावसाळ्यात घटनांमध्ये वाढ : सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यात विंचू व सर्पदंशाच्या घटना ग्रामीण व शहरी भागात अधिक प्रमाणात घडत असतात. सर्पदंश, विंचूदंश झाल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास व खबरदारी घेतल्यास संबंधिताचा जीव वाचू शकतो. याबाबत सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती केली जाते. विषारी सापाच्या दंशावर तातडीने उपचार न झाल्यास माणसाचा मृत्यू होतो. विंचूदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य असले, तरी यामुळे प्रचंड त्रास होतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू ओलावा व अडचण असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतात. शहरी भागातील नागरिकांनी घर व परिसरात, शेतकऱ्यांनी शेतात अशा ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्पतज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महिन्याभरात शेकडो लोकांना सर्पदंश• यावर्षी महिन्याभरात जिल्ह्यातील अनेक लोकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच गावठी उपचाराने काही जणांना जीवही गमवावा लागला.

विंचूदंशाच्या कित्येक घटना• शेतात व परिसरात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना विंचूदंश झाल्याच्याही कित्येक घटना घडल्याआहेत. जिल्ह्यात विचूदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत.

सर्वांत आधी काय कराल?• सर्पदंशानंतर : रुग्णास झोपू देऊ नये. दंश झालेली जागा सेलपट्टी किंवा कपड्याने झाकावी; जेणेकरून विषप्रतिरोधक मिळू शकते. तातडीने औषधोपचार करावा.

• विंचूदंशानंतर : विंचूदंश झाल्यावर तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेऊन औषधोपचार करावा; जेणेकरून संबंधिताचा त्रास कमी होईल. गावठी उपचार करू नये..

तज्ज्ञ काय म्हणतात...पावसाळ्यात विषारी व बिनविषारी साप लोकवस्तीकडे येतात. साप घरात शिरू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. लोकवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना माहिती द्यावी.- योगेश पशीने, सर्पमित्र, भंडारा.

साप किवा विंचवाने दंश केल्यास वेळीच नजीकच्या आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे; जेणेकरून उपचार वेळेत होईल आणि प्राण वाचतील. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा