शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा जगण्याचा भाग झाल्यास अपघाताचे प्रमाण घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:54 IST

दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ, जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने ३० वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारला बहुउद्देशिय सभागृह पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस उपअधिक्षक बंडोपत बनसोडे, उपअभियंता धार्मिक, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, पोलीस निरिक्षक बाळकृष्ण गाडे, जनआक्रोश संस्था नागपूरचे अनिल नखाते उपस्थित होते.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दीप प्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ केला. मोटार वाहन अपघातात प्रत्यक्षदर्शी किंवा साक्षीदार हे पोलीसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाही व एखाद्या व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने मदत करणाऱ्या व्यक्तीस कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जर अशी व्यक्ती ही स्वत:हून मोटार वाहन अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत असेल व स्वत:हून साक्षीदार बनण्यास तयार असेल तरच त्या व्यक्तीचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येईल. अशी व्यक्ती जबाब नोंदविण्यास तयार नसेल तर पोलीसांकडून दबाव आणला जाणार नाही. जबाब नोंदविण्यात तयार असलेल्या व्यक्तीस पोलीस तपासकरीता किंवा कोर्टात साक्षीकरीता बोलवावयाचे असल्यास केवळ एकच वेळ बोलविण्यात येईल. त्यास कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही यांची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मदत करणाºया नागरिकांना पारितोषिक देण्याची योजना परिवहन विभागाने सुरु करावी.मागील वर्षी जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण ४६२ वरुन ४१३ वर आले आहे. तर रस्ते अपघातात मृत्युची संख्या १६३ वरुन १५१ वर आली आहे. जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट असून या अपघात प्रवण स्थळाच्या दुरुस्तीचे काम केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रास्ताविकात दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आरती देशपांडे यांनी केले तर आभार मोटार वाहन निरिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशांत झाडे, मोहन बोर्डे, गोरख शेलार, प्रमोद सरोदे, अनिल तांबडे, व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध संघटना, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.