शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

समस्या असेल तर पोलीस ठाण्यात बिनधास्त जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे.

ठळक मुद्देवसंत जाधव : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश

n  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिक पोलीस ठाण्यात फिरायला येत नाही. कोणती तरी समस्या घेवूनच येतात. आपण प्रत्येक पोलीस ठाण्याला सूचना दिली असून प्रत्येकाचे गऱ्हाने ऐकून घेतले जाते. नागरिकांनी कोणतीही समस्या असेल तर बिनधास्त पोलीस ठाण्यात जावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे. गावठी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. आपण रूजू झालो तेव्हापासून ७५ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नागरिकांचेही यासाठी मोठे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक ठाणेदाराला आपण सूचना दिली आहे. ठाणेदार समस्या ऐकून घेत नसेल तर उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे जावे परंतु तेथेही समाधान होत नसेल तर थेट आपल्याकडे यावे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य दिले आहे. लवकरच जिल्ह्यातील गुन्हेगारांचा बिमोड करून शांतताप्रीय भंडारा जिल्ह्याच्या नावलौकीकात भर घालू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करून शांतता प्रस्थापित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले.

रेतीतस्करी रोखण्यासाठी पथकभंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचे खरे काम महसूल  प्रशासन आणि खनिकर्म विभागाचे आहे. पोलीस त्यांना संरक्षण देवून सहकार्य करते. यासाठी जिल्ह्यात पोलीस पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

भंडारातील वाहतूक समस्या सुरळीत होईल भंडारा शहरासह जिल्ह्यातील वाहतूक समस्येवर कायम तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी काय उपाययोजना करावयाच्या याच्या सूचना दिल्यात.

टॅग्स :Policeपोलिस