लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'उच्च सुरक्षा क्रमांक पाटी' (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट, एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वाहनचालक हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. दि. ३० एप्रिलपूर्वी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट न लावल्यास वाहनचालकांवर दंड आकारण्यात येईल, असा इशारा भंडाराचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्रकुमार वर्मा यांनी दिला आहे.
वाहनांची ओळख पटवणे, क्रमांकाच्या पाट्यांमध्ये होणारी छेडछाड थांबविण्यासाठी; तसेच वाहने वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांना 'उच्च सुरक्षा क्रमांक पाटी' बंधनकारक करून राज्यांना अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ३० एप्रिलपूर्वी ही नंबरप्लेट न लावल्यास दंड ठोठावला जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट नमृद करण्यात आले आहे. परिणामी दिलेल्या अवधीत जुन्या वाहनांची नंबर प्लेट बदलवून घेणे आवश्यक आहे. १९९९ पूर्वीची लाखो वाहनांवर नवीन नंबरप्लेट बसवावे लागणार आहे.
काय आहे एचएसआरपी ?ही नंबरप्लेटस अॅल्युमिनियम पासून तयार करण्यात येतात. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. वाहनाचे इंजिन व चेसिसचा नंबर लिहिला जातो. नंबर युनिक असून प्रेशर मशीनीने लिहिला जातो
शुल्क लागते किती?एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अर्ज करताना दुचाकीसाठी ५३१, तर चारचाकीसाठी वेगळे शुल्क असते.
कोणत्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक
- २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांना नंबरप्लेट बंधनकारक आहे.
- ३१ एप्रिलपूर्वी नंबरप्लेट बसवली नाही तर दंड ठोठावला जाणार आहे. नंबरप्लेटमध्ये छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, वाहन चोरीचा धोका कमी होणे, यासाठी नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे.
ऑनलाईन अर्जात अडचणएचएसआरपी नंबरप्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. मात्र, हा अर्ज करताना वाहनमालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. साईट व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
कागदपत्रे काय लागतात ?एचएसआरपी नंबरसाठी ऑनलाइन अर्ज करताना वाहनाचे सर्व डिटेल्स लागतात. त्यामुळे वाहनाचे आरसीबुक असणे गरजेचे आहे
या तारखेपर्यंत आहे मुदतएचएसआरपी नंबरप्लेटसाठी पूर्वी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
"२०१९ पूर्वीच्या वाहनाला ३० एप्रिलपूर्वी आधुनिक क्रमांकाची पाटी लावून घ्यावी. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे."- राजेंद्रकुमार वर्मा, आरटीओ, भंडारा.