शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दुकानांवर नजर; बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल!

By युवराज गोमास | Updated: May 2, 2024 16:58 IST

Bhandara : जिल्हाभरात आठ भरारी पथके गठीत; राज्य शासनाच्या कारवाईच्या सूचना

भंडारा : खरीप हंगाम तोंडावर येवून ठेवला आहे. आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुकास्तरावर सात व जिल्हास्तरावर एक असे आठ भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे खरिपासाठी जमिनीची नागरटी करून शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. याशिवाय उन्हाळी धान कापणीला तसेच मळणीला लवकरच प्रारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. परंतु, अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतीची कामे सध्या रेंगाळत चालली आहेत. उन्हाळी कामे संपताच खरीपाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

...तर परवानाही होणार निलंबित

खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

प्रत्येक तालुक्यात एक पथक

जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर आदी ७ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रताणे सात भरारी पथकांचे गठण कृषी विभागाचे आदेशान्वये करण्यात आले आहे. यासोबतच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, वेळीच तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर एक स्वतंत्र पथक

तालुकास्तरावर सात भरारी पथकांसह जिल्हास्तरावरही स्वतंत्र एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

शासनाचे सूचनेनुसार जिल्हास्तरावर एक गुणनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ७०५८२१७९७७ या क्रमांकाचा मोबाईल नंबरवर बियाणे, खते, किटकनाशके आदींच्या गुणवत्तेसाठी तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची खात्री करूनच किंवा इतर शेतकऱ्यांनी यापूर्वी लागवड केल्यानंतर मिळालेले परिणाम लक्षात घेवून बियाण्यांची खरेदी करणे अपेक्षीत आहे.

शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यतापात्र कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. तसेच खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे ७०५८२१७९७७ या मोबाईल नंबरवर तक्रार करावी. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आठ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे.- विराग देशमुख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी