शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:50 IST

गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेचे नियंत्रणच नाही : स्वच्छता अभियान व सांडपाणी व्यवस्थापनाचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शहरातील चाचा नेहरू उद्यान, राणी लक्ष्मीबाई वार्ड, सहकार नगर, समता नगर, पाण्याच्या टाकीजवळचा भाग, कारागृहाच्या मागील भाग, केशव नगर, खातरोड, तुळजा भवानी मंदिर परिसर, भगतसिंग वार्ड, बसस्थानक परिसर शांती नगर, गरुनानक वार्ड अशा अनेक भागांमध्ये तसेच अतिक्रमीत आदी सर्व प्रकारचे मिळून शेकडो रिकामे भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून तसेच कायम आहेत. सदर भूखंड हे खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात या भूखंडात दरवर्षी पाणी साचते. यावषीर्ही अशीच परिस्थिती आहे. भंडारा शहरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने रिकाम्या भूखंडात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्याचा लगतच्या घरांना व कुटुंबांना त्रास होत आहे.पावसाळा वगळता इतर ऋतुमध्ये मोकळ्या भूखंडावर लगतचे नागरिक घरातील कचरा बिनधास्तपणे टाकतात. आता पावसाचे पाणी रिकाम्या भूखंडावर साचले असल्याने कचरा तरंगत असल्याचे दिसून येत आहे. रिकाम्या भूखंडाची जागा खोलगट असल्याने येथून दुसरीकडे पाण्याची निचरा होत नाही. बहुतांश भूखंड मालक भंडारा शहरात राहत नसल्याने नगर पालिकेला सदर प्लॉटमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नालीही खोदता येत नाही. त्यामुळे रिकाम्या भूखंडापासून सांडपाण्याची तयार झालेल्या या समस्येला मार्गी लावण्यासाठी पालिकेसमोरही पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी पाणी साचून डबक्या स्वरूप प्राप्त झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पावसाळ्यात विविध आजाराची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.कर आकारणी कराशहरातील बऱ्याच प्रभागात शेकडोच्या संख्येने रिकामे-मोकळे भूखंड आहेत. सदर भूखंडाची देखभाल करण्याकडे संबंधित मालकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सदर रिकाम्या भूखंडात आता पावसाचे पाणी साचले आहे. भूखंडात साचलेल्या पाण्याचा त्रास सभोवतालच्या घरांना होत आहे. रिकामे भूखंड नेमक्या कुणाच्या मालकीचे आहे हे लगतच्या माहित नाही. रिकाम्या भूखंडाची ही समस्या मार्गी लावून सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा होण्यासाठी कार्यवाही व्हावी, त्यासाठी पालिके शहरातील रिकाम्या भूखंड मालकांवर कराची आकारणी करणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rainपाऊस