संस्काराचे मोती स्पर्धा : जी. के. वैद्य यांचे प्रतिपादनकोंढा (कोसरा) : लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा ही एक आदर्श नागरिक घडविणारी आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृध्दी करण्यासाठी स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे, असे विचार गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जी. के. वैद्य यांनी लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी व्यक्त केले.गांधी विद्यालय कोंढा येथे स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी. के. वैद्य होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त मनोहर देशमुख, विश्वस्त सुदाम खंडाईत प्रा. चरणदास बावणे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते स्पर्धेत पुरसकार मिळविलेले प्रांजली चिमणकर (वर्ग ८ ब) प्रथम, रिना दिघोरे (वर्ग ६ अ) द्वितीय, श्रेया देशमुख (वर्ग ४ अ) तृतीय यांना वाटप करण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर करण नखाते (वर्ग ७ अ), रिध्देश्वरी कुर्झेकर (वर्ग ५ अ), देव्याणी धारगावे (वर्ग ८ क), मोसम जिभकाटे (वर्ग ८ क), रोहीत कारेमोरे (वर्ग ८ क), सचिन मोहरकर (वर्ग ८ क), चैतन्या सेलोकर (वर्ग ६ अ), शुभम रामदास गिरडकर (वर्ग ८ अ), अभिषेक पुरुषोत्तम नान्हे (वर्ग ८ क), स्वाती तलमले (वर्ग ५ अ) यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डी. बी. पवार तर आभारप्रदर्शन एम. एम. सलामे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या प्राचार्य जांभूळकर तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
आदर्श नागरिक घडविणे सर्वांची जबाबदारी
By admin | Updated: January 19, 2016 00:28 IST