जवाहरनगर : संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून ठार केल्याची घटना जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या राजेदहेगाव येथील सुयोगनगरात शनिवारी मध्यरात्री १२:४५ वाजताच्या सुमारास घडली. स्नेहलता लंकेश्वर खांडेकर (२८) असे मृताचे नाव असून पती लंकेश्वर खेमराज खांडेकर (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी सलिता यशवंत गजभिये (५०) रा. ब्राह्मणी खरबी (कोहमारा) यांच्या तक्रारीनुसार, जावई लंकेश्वर खांडेकर हा पत्नी स्नेहलता (२८) हिच्याशी नेहमी संशयावरून भांडण करीत असल्याचे, असे फोनद्वारे स्नेहलताने आपल्या आईला सांगितले होते. यात लंकेश्वर समजविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. १८ जुलै रोजी रात्री १२:४५ वाजता कडाक्याचे पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात लंकेश्वरने पत्नीचा गळा आवळून जागीच ठार केले. खांडेकर दाम्पत्याला पाच वर्षाची एक शायना नावाची मुलगी आहे. लंकेश्वर हा आयुध निर्माणी जवाहरनगर येथे खासगी कंत्राटदाराकडे कुकचे काम करीत होता. पुढील तपास ठाणेदार पंकज बैसाने करीत आहे.