शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित

By admin | Updated: May 17, 2014 23:29 IST

२३ फेब्रुवारीला आलेल्या अस्मानी संकटाने पालांदूर परिसर हादरुन गेला. केवळ ४५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

पालांदूर : २३ फेब्रुवारीला आलेल्या अस्मानी संकटाने पालांदूर परिसर हादरुन गेला. केवळ ४५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. शेतपिक, घराचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे आटोपले, शासन स्तरावरुन निधीही आला. तरीही कित्येक शेतकर्‍यांना आजही मोबदला मिळाला नाही. खराशी, खुनारी, लोहारा, पळसगाव, घोडेझरी परिसरात शेतीची, घरांची अतोनात नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागला. वजनदार नेत्यांनी हजेरी लावत नुकसानभरपाई मिळणारच असा दावा करीत तहसीलदार लाखनी यांना निधी पाठवला. यातील काही शेतकर्‍यांना निधी थेट खात्यात मिळाला तर बर्‍याच शेतकर्‍यांना खाते उघडूनही नुकसान भरपाई आताही मिळालीच नाही. अनेक शेतकरी वारंवार बँकेचे उंबरठे झिजवून थकला. शाखा व्यवस्थापकही निरुत्तर झाले. हतबल शेतकरी खरीपाच्या तयारीत लागण्यापूर्वी निराश झाला. माजी पंचायत समिती सदस्य वसंत शेळके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की तहसीलदार लाखनी यांचा कारभार कासवगतीने चालू आहे. चुकाच चुका असल्याने बँकेत आलेले रुपये परत गेले. यामुळे शेतकर्‍यांना मानसिक धक्का सहन करावा लागत आहे. तालुक्याला नेतृत्व कमजोर पडत असल्याने प्रशासनावर धाक उरला नाही. कर्मचारीगण आपल्याच तोर्‍यात असल्याने शेतकरी नादार होत आहे. शेतकर्‍यांची दयनीय अवस्था चिंताजनक असून चालू पिककर्ज थकित झाला आहे. यामुळे नव्याने पिककर्ज मिळण्याकरीता मार्ग बंद झाला आहे. शासन स्तरावर योजना आखल्या जातात. पण राबविताना प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने योजना कागदावरच राहतात. यामुळे विकास हा केवळ देखावा आहे. गारपीेटग्रस्तांच्या असह्य वेदना समजून घेणारा व त्यांना सर्वतोपरी शासनाकडून मदत मिळवून देणारा देवदूत लाखनी तालुक्याला मिळेल का असा प्रश्न वसंत शेळके यांनी केला आहे. एकंदरीत त्वरित गारपीटग्रस्तांना मदत मिळण्याकरीता प्रशासनस्तरावर प्रामाणिक प्रयत्नांची गरज असून तशी मागणी वसंत शेळके यांनी केली आहे. खराशी : खराशी : जुन-जुलै २०१३ या कालावधीत पावसाच्या तडाख्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यानंतर राज्य शासनाने मदतीची घोषणा केली आणि ती मदत स्थानिक प्रशासनाच्या खात्यावर जमा झाली मात्र अजुनही अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (वार्ताहर)