शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

शेकडो महिलांचा जत्था पोलीस ठाण्यात धडकला

By admin | Updated: December 24, 2016 02:16 IST

येथील लायब्ररी चौकात ज्यांच्यामुळे राडा घडला, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि निर्दोष

मारहाणीचे प्रकरण : पोलिसांनी जमावाची समजूत काढली भंडारा : येथील लायब्ररी चौकात ज्यांच्यामुळे राडा घडला, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि निर्दोष लोकांवर कारवाई करू नये, या मागणीसाठी आज शुक्रवारला दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास ४० ते ५० महिलांचा जत्था पोलीस ठाण्यात धडकला. अचानकपणे पोलीस ठाण्यात एवढ्या प्रमाणात महिला आल्याने सर्वांच्या नजरा पोलीस ठाण्याकडे वळल्या होत्या. २१ डिसेंबरला लायब्ररी चौकात निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. प्रथम कोण, कुणी हात उगारला याची चर्चा सुरू आहे. मात्र वस्तुस्थिती घटनास्थळी प्रत्यक्षदर्र्शींना माहित होती. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी उशिरा का होईना धरपकड केली. घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत एका गटातील १९ व दुसऱ्या गटातील २० जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले. सर्व जणांना अटक झाल्याची माहितीही प्रसिद्धीला देण्यात आली. वस्तूस्थितीत आजघडीला एका गटातील पाच व दुसऱ्या गटातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे राडा घडला त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या कुटुंबियातील महिलांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचल्या. ४०-५० हून जास्त महिला या जमावात सहभागी झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात काही घटना तर घडली नाही ना! असा संशय व्यक्त करीत जो तो पोलीस ठाण्याकडे येत होता. यावेळी पोलीस ठाण्यात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरिक्षक जयवंत चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपली बाजू मांडली. पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांची बाजू ऐकून त्यांचे समाधान केले. त्यानंतर महिलांचा जत्था आल्यापावली शांततेत परतला. (प्रतिनिधी) लायब्ररी चौकात सामसुम ४दोन दिवसांपूर्वी लायब्ररी चौकात नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद काल दिवसभर होते. तर आज तिसऱ्या दिवशीही या चौकात सामसूम दिसून आली असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. दोन्ही गटाविरूद्ध गुन्हे दाखल ४यादरम्यान दोन्ही गटातर्फे एकमेकांविरूद्ध तक्रारी असल्यामुळे भंडारा पोलिसांनी भादंवि ३२३, ३२४, ३२६, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, सहकलम १३५ महाराष्ट पोलिस कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत. या मारहाणप्रकरणी दोषींविरूद्ध कठोर कारवाई करावी, निर्दोषांवर कारवाई होऊ नये, अशी मागणी या महिलांनी केली. जखमींवर उपचार सुरू असून तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तपास सुरू असून कायद्यानुसार योग्य ती पाऊले उचलण्यात येईल. - जयवंत चव्हाण, पोलीस निरिक्षक, भंडारा.