शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पवनी नगरातील शेकडो वृक्ष वाळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:50 IST

अशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : नगरातील रस्त्याच्या कडेला उपलब्ध जागेवर विविध प्रजातीच्या झाडांचे रोपटे सलग दोन वर्षे ...

ठळक मुद्देउन्हाचा तडाखा : झाडे वाचविण्यासाठी नगर परिषदेचा खटाटोप, समस्यांकडे पाठ

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगरातील रस्त्याच्या कडेला उपलब्ध जागेवर विविध प्रजातीच्या झाडांचे रोपटे सलग दोन वर्षे लावण्यात आले. लागवड केलेले रोपटे जगविण्यासाठी काही दिवस प्रयत्न झाले. ज्यांनी रोप लावून जगविण्याचा प्रयत्न केला त्यांची तडकाफडकी बदली झाली आणि नगरातील सर्व झाडे पोरके झाले. लक्षावधी रुपये पाण्यात गेले. हजारोच्या संख्येने लागवड केलेली झाडे पाण्याअभावी उन्हाच्या तडाख्याने वाळली.नगरात झाडे लावून जगविण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची होती. परंतू प्रशासनाला जबाबदारी कळली नाही, परिणामी मोठ्या संख्येने झाडे वाळली. पावसाळा सुरू होणार , शासनाची झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम पुन्हा सुरू होणार म्हणून की काय, नगर पालिका प्रशासनाला जाग आली. ऐन पावसाळ्याचे तोंडावर अग्निशमन दलाचे वाहनाने पाणी टाकून वाळलेली झाडे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. त्यामुळे पालिका प्रशासनात सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा खुद्द काही नगरसेवक दबक्या आवाजात करीत आहेत.झाडांच्या संवर्धनाप्रमाणेच नगरातील उखडलेले रस्ते , नाल्यांची स्वच्छता , नालीवरील तुटलेले कव्हर , स्ट्रीट लाईट , पाणी पुरवठा यंत्रणा अशा सर्वच बाबी दुर्लक्षीत आहेत. परंतू पालिका प्रशासन , पदाधिकारी व नगरसेवक या सर्वांनी नागरिकांच्या समस्यांकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई