शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालय, सेतू केंद्रांवर शेकडो नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:03 IST

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना : सुविधांअभावी नागरिकांत संताप

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाने नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्जाला सुरूवात झाली असून १५ जुलै अंतिम तिथी आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून धावपळ वाढली आहे. भंडारा शहरात मंगळवारी सिव्हील लाईन परिसरातील तलाठी कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तर सेतू केंद्रात तहसीलदारांच्या उत्पन्न व डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी शेकडो नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तासन् तास नागरिक रांगेत उभे होते. दरम्यान, कोणत्याही सुविधा प्रशासनाने न पुरविल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण दिसून आले.

मंगळवारला तलाठी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले तसेच सेतू केंद्रावरही नागरिकांच्या रांगा आणि तोबा गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. कार्यालयात जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.

सकाळी ८ वाजतापासूनच काही नागरिक दोन्ही कार्यालयांसमोर दिसून आले. अनेकांनी अन्न व पाण्यापासून ताटकळत माहिती दिली. अर्ज करण्याचा कालावधी कमी असल्याने गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. गर्दीचे चित्र दूरवरून दिसून येताच अनेकांनी काढता पाय घेतला. सायंकाळपर्यंत पुरुषांचीहीची अशी तोबा गर्दी दिसून आली. नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. गैरसोयीचा सामनाही नागरिकांना करावा लागत असल्याचे दिसून आले.

१०० रुपयांच्या स्टॅम्पसंबंधी सूचना नाहीतअनेक महिलांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरच्या नावात बदल असतात. त्यामुळे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र, अशा प्रतिज्ञापत्रासाठी कोणत्याही सूचना नाहीत, अशी माहिती नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांनी दिली.

रात्री ११ पर्यंत सुरू होते तलाठी कार्यालययोजनेच्या पहिल्याच दिवशी सोमवारला भंडारा सिव्हील लाईन परिसरातील तलाठी कार्यालयासमोर महिला व पुरुषांची गर्दी होती. महिला चिमुकल्यांसह उपस्थित होत्या. महिलांच्या सोबतीला काहींची मुले तर काहींचे पती सुद्धा उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नागरिकांनी सोबत आणलेली वाहने रस्त्यावरच उभी केल्याने त्या भागातील वाहतूक प्रभावित झाली होती. रात्री ११ वाजतापर्यंत तलाठी कार्यालय सुरू होते, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.

बहिणी म्हणतात...तलाठी मुख्यालयी रहावेही योजना आम्ही महिलांसाठी चांगली आहे. मात्र योजनेतील अटी व शर्तीमुळे धावपळ होत आहे. ग्रामीण भागातील तलाठ्यांना मुख्यालयी राहणे सक्त्तीचे केले जावे. तरच आमची रोजी बुडणार नाही.- ललिता देशमुख, भंडारा.

योजना बंद पडू नयेमुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हा महिलांना मासिक १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. हा मोठा आधारच होणार आहे. मात्र ही योजना मध्येच बंद पाडली जाऊ नये. तलाठी कार्यालय व सेतू केंद्रांवर पाणी उपलब्ध करावे. - स्वाती सेलोकर, भंडारा

योजनेच्या अर्जासाठी मुदत वाढ दिली जावीसध्या या योजनेसाठी १५ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. परंतु लाभासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे मुदत वाढवावी.आरटीओ कार्यालयाशेजारील सेतू केंद्रात नागरिकांची अशी झुंबड उडाली.- लता बोरकर, भंडारा 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा