शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अधिक व्याजाच्या आमिषात भंडारेकरांना कोट्यवधींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:04 IST

आयुष्यभर पै-पै गोळा करून जमवलेली आयुष्याची पुंजी अधिक व्याजाच्या आमिषात शेकडो नागरिकांनी गमावली. एक-दोन टक्का अधिक व्याजासाठी खासगी वित्तसंस्थांत गुंतवलेले पैसे घेऊन या कंपन्या पसार झाल्या आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा चुना या कंपन्यांनी लावला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अशा फसवणूक करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देशेकडो ग्राहकांची फसवणूक : अनेकांनी गमावली आयुष्याची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयुष्यभर पै-पै गोळा करून जमवलेली आयुष्याची पुंजी अधिक व्याजाच्या आमिषात शेकडो नागरिकांनी गमावली. एक-दोन टक्का अधिक व्याजासाठी खासगी वित्तसंस्थांत गुंतवलेले पैसे घेऊन या कंपन्या पसार झाल्या आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा चुना या कंपन्यांनी लावला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अशा फसवणूक करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात अधिक व्याज देणाºया वित्त संस्थांचे पेव फुटले आहे. या कंपनीत मिळणारी सौजन्याची वागणूक आणि घरी येणारा एजंट याची भुरळ पडून अनेकांनी आपले पैसे यात गुंतवले. राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा एक-दोन टक्का व्याज अधिक मिळत असल्याने अनेक जण त्यांच्या भूलथापांना बळी पडले. हजारो ग्राहकांनी अशा पद्धतीने पैसे गुंतवले. मात्र पैसे काढण्यासाठी गेल्यावर एक तर या कंपनीने पोबारा केल्याचे दिसून आले किंवा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले.भंडारा शहरातील हजारो ग्राहकांना मैत्रेय स्वर्णसिद्धी या कंपनीने तब्बल १५ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. एजंटांच्या माध्यमातून शहरातील मध्यमवर्गीयांकडून ठेवी जमा केल्या. आता ही कंपनी पसार झाली आहे. अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन जणांना नाशिकवरून अटक केली आहे. मात्र अद्यापही शेकडो ग्राहकांचे पैसे परत मिळाले नाही. यालस्को रियल इस्टेट अ‍ॅग्रो फार्मींग लिमीटेड या कंपनीनेही शेतकºयांना असा गंडा घातला. या कंपनीने जिल्ह्यातील ५०० वर शेतकºयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.जनसुरक्षा फाउंडेशनने १० लाखाने ग्राहकांची फसवणूक केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दि लाईफ इंडिया डेव्हलपर्स या कंपनीने जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना दोन कोटी २१ लाख ७६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को आॅपरेटीव्ह कंपनीनेही अशीच नागरिकांची फसवणूक केली आहे.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तोपर्यंत फसवणूक करणारे शहरातून पसार झाले होते. आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे गुंतवणूक करणाºयांमध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात लावली होती. काही नागरिकांनी तर दहा-दहा लाखापर्यंत गुंतवणूक केल्याची माहिैती आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही मंडळी आता पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु हक्काची कमाई अशा पद्धतीने लंपास झाल्याने अनेकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.या वित्तीय कंपन्यांसोबतच सहकारी पतसंस्थांनीही काही ठिकाणी गंडा घातल्याचे दिसून येत आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील सृष्टी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने ग्राहकांकडून २३ लाख ५ हजार रुपयांची वसुली केली. मात्र ती संस्थेत भरली नसल्याचे पुढे आले तर लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील छत्रपती शिवाजी महाराज अकृषक सहकारी पतसंस्थेनीही २२ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला. बनावट दस्ताऐवज तयार करून संस्थेतील सभासदांचे पैसे घेतले. याप्रकरणी संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल असून तिघांवर अटक करण्यात आली.लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील विविध कार्यकारी सोसायटीला तर चक्क शिपायानेच गंडा घातला. शेतकरी सभासदांकडून वसूल केलेले चार लाख ६२ हजार रुपये संस्थेत भरलेच नाही. या प्रकरणी आता लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरात अशा पद्धतीने अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. शेकडो ग्राहकांची फसवणूक झाल्याने तपासणीसाठी विलंब लागत आहे.पैसे गुंतवताना दहादा विचार कराकोणत्याही योजनेत अथवा वित्तीय संस्थेत पैसा गुंतविताना दहादा विचार करण्याची गरज आहे. राष्ट्रीयकृत बँकांसह पोस्टाच्या विविध योजना आहेत. यातून व्याज कमी मिळत असले तरी पैसा परताव्याची हमखास गॅरंटी असते. मात्र अनेक जण खासगी वित्तीय संस्थांच्या आमिषाला बळी पडतात. यासोबतच जिल्ह्यात नोकरीचे आमिष देऊन गंडा घालण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात पुढे आले आहे. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सजग असणे आवश्यक झाले आहे.