शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर कसे नाहीत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 06:04 IST

राज्यात ३५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू : ५० लाखांच्या विम्यासह अनुकंपावर नोकरीची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून कृषी कर्मचारी कर्तव्य निभावत आहेत. मात्र तरीही शासनाकडून फ्रंन्टलाइन वर्कर नसल्याचे कारण दाखवत शासनाने अद्यापही कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात ५० लाखांचे विमा कवच अजूनही कृषी कर्मचाऱ्यांना दिले नाही.

कोरोना काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला,फळांचे होणारे नुकसान तसेच भाजीपाल्याचा कुठेही तुटवडा भासू नये यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावले. याकाळात कर्तव्य बजावताना ३५ कृषी अधिकारी,कर्मचाऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ५० लाखांचे विमा कवचासह कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेसह, महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर राज्य राजपत्रित तांत्रिक कर्मचारी संघटनेने कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातही आजपर्यंत आठ जणांचा मृत्यु झाला आहे. राज्यात ३५ कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक अधिकारी, कर्मचारी आज कोरोना संसर्गाने बाधित झाले असून आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र तरीही शासनाकडून कृषी कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय दिला जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे करून मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख सानुग्रह अनुदान तसेच अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी होत आहे राज्यात आजपर्यंत ३५ अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोरून आणि मृत्यू झाला आहे. याकडे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विशेष लक्ष घालून कृषी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.

ट्रेझरी विभाग फ्रंटलाइन वर्कर कसाn जे शासकीय विभाग थेट लोकांच्या संपर्कात येतात त्यांना शासनाने फ्रंटलाइन वर्कर म्हणून ५० लाखांच्या विमा योजनेचा लाभ दिला आहे. यात पोलीस,आरोग्य, होमगार्ड, महसूल,ग्रामविकास विभागाचे कर्मचारी ईतकेच नव्हे तर ट्रेझरी विभागात कार्यालयात काम करणारेही कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश केला आहे. तर दुसरीकडे दररोज कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांचा अनेक शेतकरी, स्थानिक पातळीवरील सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागाचे स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांशी दररोज संपर्क येत असतानाही आजपर्यंत फ्रंन्टलाइन वर्कर नसल्याचे सांगितले जात आहेत. कोरोना काळात कृषी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने सरकार टिका केली जात आहे.

लाॅकडाॅऊन काळातील कृषी कर्मचारी खरे कोरोना योद्धे आहेत. राज्यात भाजीपाला, फळांचा कुठेही तुटवडा पडू नये यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा निभावली. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनातही कर्तव्य निभावले त्यांना शासनाने त्वरीत न्याय द्यावा,अशी आमची मागणी आहे.- आनंद मोहतुरे, जिल्हाध्यक्ष, कृषी सहाय्यक संघटना, भंडारा

जिल्ह्यात आतापर्यंत आठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजही कर्मचारी कर्तव्यावर आहेत. मात्र कृषी कर्मचाऱ्यांना लस द्यायला विलंब केला. याशिवाय ५० लाख विमा याेजनेचा लाभ न दिल्याने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे. फ्रंन्टलाइन वर्करमध्ये समावेश करुन कृषी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा.- गोपाल मेश्राम, कोषाध्यक्ष, कृषी सहाय्यक संघटना, भंडारा

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbhandara-acभंडारा