शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

धानाचे गोडावून झाले हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:40 IST

खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग विभागाने केली आहे. यामुळे सिहोरा परिसरातील धानाचे गोडाऊन हाऊसफुल्ल आहे. उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचण येणार आहे.

ठळक मुद्देउन्हाळी धान साठवणूक अडचणीत : धानाची उचल करण्याची शेतकऱ्यांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग विभागाने केली आहे. यामुळे सिहोरा परिसरातील धानाचे गोडाऊन हाऊसफुल्ल आहे. उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचण येणार आहे.सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पीक शेतकरी घेत आहेत. या परिसरात धानाचे विक्रमी उत्पादन होत आहे. यामुळे पाच कि.मी. अंतरावर धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. धानाचे उत्पादन होत असताना नवीन गोडावूनची निर्मिती शासनस्तरावर करण्यात येत नाही. शासकीय दरात खरेदी करण्यात आलेल्या धानाला संरक्षण देणारे उपाय योजना अपुरे ठरत आहेत. या साधनाचे अभावाने अवकाळी पावसाचे कचाट्यात धानाचे उघड्यावर ठेवण्यात येणारी पोती सापडत आहेत. काही धानाच्या पोतीची नासाडी होत आहे. या परिसरात बपेरा, चुल्हाड, वाहनी, सिहोरा आणि हरदोली गावात खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यात आली आहे.दी सहकारी राईस मिल सिहोराचे हद्दीत असणारे चार गोडावून धानाचे पोतीनी हाऊसफुल्ल आहे. या गोडावूनमध्ये १३ हजार ८०८ क्विंटल धानाची पोती पडून आहेत. बपेरा गावात ४ हजार पोती हरदोली गावात २ हजार पोती गोडावूनमध्ये आहेत. यामुळे उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचणीची ठरणार आहे. सध्या स्थिती उन्हाळी धानाची खरेदी शासकीय खरेदी केंद्रावर सुरु करण्यात आली आहे. परंतु या केंद्रावर शेतकºयांनी धानाची विक्री करण्यासाठी आवक सुरु केली आहे. त्यांची पोती उघड्यावर पडून आहेत. दरम्यान वारंवार वातावरणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. उघड्यावर असणाºया धानाचे पोतींना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकºयांच्या धानाला सुरक्षा कवच देणारे उपाययोजना करण्यात येत नाही. बहुतांश गावात गोडावून नाही. प्रत्येक गावात धानाचा पट्टा असताना या गावात धानाचे गोडावून निर्माण करायला पाहिजे. या गोडावूनची निर्मिती ग्रामपंचायत मार्फत समाज भवनाचे धर्तीवर करण्याची आवश्यकता आहे.चार ही गोडावून धानाचे पोतींनी हाऊसफुल्ल आहेत. यामुळे उन्हाळी धानाचे पोती ठेवताना अडचणी वाढणार आहे. जिल्हा मार्केटिंग विभागाने याकडे लक्ष देवून पाऊल उचलले पाहिजे.-सुभाष बोरकर, उपाध्यक्ष दि सहकारी राईस मिल, सिहोरा.