शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

डॉक्टरांअभावी रुग्णसेवा वाऱ्यावर

By admin | Updated: August 6, 2016 00:34 IST

सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण वाऱ्यावर असून व्यवस्था कोलमडली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : डॉक्टरांना कामावर रूजू करा अन्यथा पर्यायी व्यवस्था कराभंडारा : सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण वाऱ्यावर असून व्यवस्था कोलमडली आहे. डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील सामान्य, गरीब रुग्णांसाठी एकमेव आशास्थान असलेले सामान्य रुग्णालय हे स्वत:च डायलिसीसवर असल्यामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचे भविष्य धोक्यात आले तरी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक हातावर हात धरून बसले असल्याचा स्पष्ट आरोप निवेदनाद्वारे केला आहे.जिल्ह्यात सगळीकडे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारामुळे शासकीय तसेच खासगी दवाखाने रुग्णांनी फुलून गेलेली आहेत. अशातच ग्रामीण रुग्णांसाठी मोठा आधार असलेला सामान्य रुग्णालयात मात्र सेवेत असणारे डॉक्टर्स बळजबरीने मागील आठ दिवसांपासून तर कोणी पंधरा दिवसांपासून सुट्यावर गेलेले असल्यामुळे सामान्य रुग्णालयातील व्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. याच रुग्णालयातील लेबर रुमसाठी ५ डॉक्टरांची नियुक्ती आहे. परंतु त्यापैकी डॉ.निवाने, डॉ.बांडेबुचे आणि डॉ.खोब्रागडे या मागील दहा बारा दिवसापासून आजाराचे कारण दाखवून सुट्यांवर असल्यामुळे यांचा कामाचा ताण केवळ दोन डॉक्टर्सवर आल्यामुळे दिवसेंदिवस डिलेवरी वॉर्डात रुग्णांची वाढ होतच आहे. आजच्या घडीला २०० हून अधिक महिला रुग्ण डिलेवरीसाठी वाट बघताहेत. परंतु यासाठी मात्र डॉ.भावसार व डॉ.बागडे हेच सेवा देत आहेत. सामान्य रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढत असल्यामुळे डॉक्टर मंडळी या रुग्णांना मेडीकल कॉलेज नागपूर येथे बळजबरीने रेफर करीत आहेत. त्यामुळे याचा नाहक भुर्दंड गरीब रुग्णांवर सोसावा लागत आहे. असे असतानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते रुग्णालयाची परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असून ज्या डॉक्टरांनी आजाराचे कारण देवून सुट्या घेतल्या तीच डॉक्टर मंडळी स्वत:च्या खासगी रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना ताबडतोब २४ तासात कामावर रूजू होण्याचे आदेश द्यावेत, रूजू न झाल्यास त्यांना कामावरून काढून टाकावेत तसेच तोपर्यंत अन्य ठिकाणाहून पर्यायी व्यवस्था म्हणून किमान चार गायनीक डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात शिवसेनाद्वारे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुका प्रमुख अनिल गायधने, शहर प्रमुख नितीन साकुरे, ललीत बोंद्रे, विशाल लांजेवार, यशवंत टिचकुले, मयूर लांजेवार, आकाश जनबंधू, राजेश मेश्राम पं.स. सदस्य, पंकज दहिकर, सुधीर उरकुडे, प्रकाश पारधी यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)