शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडीने ग्रामीण भागात 'शेकोटी' पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:07 IST

आबालवृद्धांना थंडीचा त्रास तर गावात शेकोटीचा जोर. दोन महिने झाले हिवाळा सुरू होवून मात्र नवीन वर्ष लागताच थंडीचा जोर वाढल्याने .....

ठळक मुद्देआबालवृद्ध त्रस्त : आजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ, वातावरणाने पिकांना धोका

आॅनलाईन लोकमतआंधळगांव : आबालवृद्धांना थंडीचा त्रास तर गावात शेकोटीचा जोर. दोन महिने झाले हिवाळा सुरू होवून मात्र नवीन वर्ष लागताच थंडीचा जोर वाढल्याने आंधळगाव परिसरातील सर्व ग्रामीण भागात थंडीची हूडहूडी भरल्याचे चित्र दिसत आहेत, त्यामुळे गावे सुन्न होवून प्रत्येक घरी, चौकात शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे.ग्रामीण भागात रूम हिटरची व्यवस्था शुन्य असल्याने शेतकरी, मजूर व इतर गृहिणी हे घरी असणाºया सरपणाच्या काड्यांचा गठ्ठा तयार करून शेकोटीसाठी दुपारी शेत-शिवारात जावून जमा करतात. वातावरणाने १५ दिवसापासून आपले रंग बदलवून वेगळा ढगाळ वातावरण तयार केल्याने शेतकरी रब्बी पिकावर रोगाचा प्रादूर्भाव होईल. या चिंतेत होता. अगोदरच खरीप हंगामाच्या धान पिकाने शेतकºयांचे वेळेवर हातात येणारे धानपिक हिसकावून घेतले. सध्या मात्र आभाळ स्वच्छ होत असल्याने थंडी वाढू लागली आहे व अचानक चार-पाच दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने पहाटे, रात्री तर दिवसभर थंडीचा गारवा वाढला आहे.हिवाळ्यात काही दिवस अशीच थंडी राहिली तर यावर्षी रब्बी पिक हंगाम चांगला राहिल, अशी आशा शेतकºयांना आहे. पिकासाठी सध्याची थंडी पोषक असल्याने तुर, चणा, हरभरा, मुंग, गहू या पिकांची चांगली आवक होईलही आशा शेतकऱ्यां ना आहे तर ही थंडी आबाल, वृद्धांना, लहान बालके, दमा रुग्ण, हड्डीजोड रुग्ण यांना घातक ठरू शकते. त्यामुळे बरेच आबालवृद्ध डॉक्टरांच्या दवाखान्यात ये-जा करताना दिसतात तर थंडी वाढल्याने कृषी केंद्रधारक रब्बी पिकासाठी रासायनिक खताची मागणी करीत आहेत तर जनता थंडीच्या बचावासाठी शेकोटीचा सहारा घेत आहेत.