शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आयसोलेशन वॉर्डातून २०३ व्यक्तींना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. गत १५ दिवसापूर्वी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सदर व्यक्तीच्या अतीजोखीम संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. तर १५ दिवसानंतर सदर व्यक्तीचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने तुर्तास भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

ठळक मुद्दे१२ अहवालांची प्रतीक्षा : हॉस्पीटल क्वारंटाईनमधून ३९७ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २०३ व्यक्तींना आणि संस्थात्मक अलगीकरण कक्षातून ३९७ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसून गत १५ दिवसापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीचे दोनही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून नागपूर येथे पाठविलेल्या ६१७ पैकी ६०४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १२ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.भंडारा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. गत १५ दिवसापूर्वी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सदर व्यक्तीच्या अतीजोखीम संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. तर १५ दिवसानंतर सदर व्यक्तीचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने तुर्तास भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १०व्यक्ती दाखल आहेत. तर आतापर्यंत तेथे उपचार घेऊन २०३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी नर्सिंग वसतिगृहाच्या अलगीकरण कक्षात २१ व्यक्ती दाखल असून तुमसर, मोहाडी आणि साकोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये २२ व्यक्ती असे ४३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल आहेत. आतापर्यंत ३९७ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे.सोमवारी ११ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आले असून पूर्वीचा एक असे १२ अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत ६१७ नमुन्यांपैकी ६०४ नमुने निगटिव्ह आले आहेत. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.तीव्र श्वासदाहचे ११८ व्यक्ती दाखलजिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्रात फ्ल्यू ओपीडी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत तीव्र श्वासदाहचे ११८ व्यक्ती दाखल करण्यात आले. त्यापैकी ११७ व्यक्तींच्या घशातील स्बॅबचे नमुने पाठविले असता ११५ नमुने निगटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अप्राप्त आहेत. यासोबतच घरोघरी जाऊन आशा व अंगणवाडी सेविकामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहेत.१३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणीभंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत १३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आली. सतत जनतेच्या संपर्कात येणाºया या सर्व अधिकाºयांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य