शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आशा गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:22 IST

आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती समितीची मागणी आहे.

ठळक मुद्देसंपाचा फटका : आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागाची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे अशा आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्याची कामे ठप्प झाल्याचे दिसत आहे.आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती समितीची मागणी आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना मिळणारे मानधन हे दारिद्र्य रेषेखालील व किमान वेतनाखालील असून त्यांना वेठबिगारी सारखे वागविले जाते.गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय सेवेत कायम करेपर्यंत अंगणवाडी सेविकेऐवढे तरी मानधन देण्यात यावे निवेदनात म्हटले आहे. याबाबत २२ २३ जानेवारी २०१९ रोजी मुंबई मंत्रालयात व ६ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली होती.तसेच १४ जून २०१९ रोजी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आणि यानंतरच्या बैठकितही आशा स्वयंसेवकांचे मानधन अडीच ते तीन पट वाढविण्यात येईल असे ठोस आश्वासनही देण्यात आले होते.आशा स्वयंसेवकांना सायकल तर गटप्रवर्तकांना स्कुटी देण्याचे मान्य केले. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आशा व गटप्रवर्तकाचे मानधन अडीच ते तीन पट वाढविण्याबाबत विधान परिषदेमध्ये निवेदन दिले होते. यासंबधी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी मानधन वाढीबाबत आदेश काढण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आजपासून आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संपाची हाक दिली. सदर जिल्हा परिषद भंडारा समोर कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महसचिव प्रिती मेश्राम यांचे नेतृत्वात सोनू सार्वे, सुनिता डाकरे, तुलना बडोले, श्ुाभांगी मेश्राम, मंगला गौरी, मंदा मस्के आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStrikeसंप