शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावातील इतिहासप्रसिद्ध शंकरपट विस्मृतीत जाणार

By admin | Updated: February 11, 2016 01:12 IST

तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील शंकरपट भंडारा जिल्ह्यातील एक कौतुकाचा व गौरवाचा विषय होता. गत ९७ वर्षापासून दरवर्षी वसंतपंचमीला शंकरपटाचे ऐतिहासिक ...

पटशौकिनांचा हिरमोड : शताब्दीकडील वाटचाल थांबलीचंदन मोटघरे लाखनीतालुक्यातील पिंपळगाव सडक येथील शंकरपट भंडारा जिल्ह्यातील एक कौतुकाचा व गौरवाचा विषय होता. गत ९७ वर्षापासून दरवर्षी वसंतपंचमीला शंकरपटाचे ऐतिहासिक आयोजन व्हायचे. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्याने शंकरपटासाठी प्रसिद्ध असलेला पिंपळगावचा शंकरपट आता इतिहासाचा भाग बनणार आहे. पिंपळगावचा सांस्कृतिक वारसा व वैभव यामुळे हरवले आहे.पिंपळगावच्या शंकरपटाला इतिहास आहे. ३० नोव्हेंबर १९१९ ला येथील मालगुजार श्रीमंत चिंतामणराव घारपुरे यांचेकडे पुत्ररत्न जन्मास आले. सर्वांना अत्यानंद झाला. प्रतिष्ठीत मान्यवर मंडळी जमली, चर्चा सुरू झाली. हा आनंदोत्सव कसा साजरा करायचा. शेवटी शंकरपट भरवायचा यावर एकवाक्यता झाली. वसंत पंचमीचा मुहूर्त ठरला. पटाची जागा निश्चित झाली. श्रीमंतानी पटांची जागा १२ फेब्रुवारी १९२० ला वसंतपंचमीच्या शुभमूहूर्तावर शंकरपटाचा शुभारंभ झाला. याचदिवशी दान दिलेल्या दाणीवर पहली जोडी भरधाव पळाली. वसंतपंचमीचा मुहूर्त कायम राहिला. न्यायालयाने बंदी घातल्यामुळे यावर्षी दाणीवरून बैलजोडी सुटणार नाही. जुन्या आठवणीवर गावकरी वसंतपंचमीचा मुहूर्त साजरा करणार.पिंपळगाव येथील शंकरपटात बक्षिसाची लयलुट होती. पूर्वी झेंडी आणि वेसनी बक्षिसात दिल्या जायच्या पिंपळगावच्या पटाची दान लांब पत्याची असायची. पटाची पूर्व पश्चिम लांबी १३३५ फूट ४४५ मीटर आहेत. एवढे नंतर कापायला बैलांची दमछाक होत असे. प्रथम या पटाची संपूर्ण व्यवस्था येथील मालगुजार गावकऱ्यांचे सहकार्याने स्वत: करीत असत. मागीलवर्षीपर्यंत पट समितीकडे जबाबदारी होती. या पटाच्या ९७ वर्षाच्या कालावधीत १९४४ ला रौप्य महोत्सव, १९६९ ला सुवर्ण महोत्सव व १९९४ ला अमृत महोत्सवाचे आयोजन धडाक्यात करण्यात आले होते. न्यायालयाने शंकरपटाला मान्यता दिली तर शंकरपटाची शतकी साजरी होणार आहे.सन १९२० मध्ये सुरू झालेला शंकरपटाची नोंद शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात पिंपळगावचे नाव पोहचते होते. पहिल्या पिढीतले पिसाराम कमाने, शिवराम शिवणकर, महारू शिवणकर, जन्मुसाव, तात्या दिवानजी, साताराम कमाने, अ. गफूर शेख, हरबा कमाने, हळू भाजीपाले, रामजीबापू निनावे, सखाराम बोरकर यांनी पहिला पट भरविण्यात योगदान दिले. पटाची परंपरा सातत्याने टिकवून धरण्यामध्ये सदाशिव शिवणकर, देवजीबापू कमाने, रामाजी शेळके, गणेश सोहनी, तुळीशराम दोनोडे, काशीराम शिवणकर, केशवराव शिवणकर, गोविंदराव कमाने, अर्जुन मेश्राम, केशवराव घारपुडे, नत्थुजी तरोणे, भागवतराव कमाने, देवा हुकरे, श्रावण शिवणकर, पुंडलीकराव रोकडे, मो. इशाक शेख, दोनोडे, महादेव नवखरे, तेजराम कमाने, मोडकू रोहनकर, मोडकू बेहरे, सोविंदा मते, श्रावण शेळके, लांजेवार यांनी शंकरपटाची परंपरा कायम रहावी यासाठी योगदान दिले.१९३० साली रा महात्मा गांधीनी सुरू केलेल्या अहिंसा चळवळीला जोर आला. तेव्हा पट समितीने बैलांना तुतारीने न टोचण्याचा निर्णय घेतला. कै. चिंतामणराव घारपुरे कट्टर ध्येयवादी व अहिंसावादी काँग्रेसी असल्यामुळे सन १९३०-३१ चा पट विना तुतारीने हाकलण्यात आला. दि.२८ ते २४ जानेवारी १९६१ ला पिंपळगावला शंकरपटनिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते २२ जानेवारी १९६९ ला सुवर्ण महोत्सवी शंकरपटानिमित्त सुवर्ण पदकाचे बक्षिस देण्यात आले. १९७९ ला हिरक महोत्सवानिमित्त हिरकणी जडवलेली सोन्याची अंगठी प्रथम क्रमांकाच्या बैल जोडीस भेट देण्यात आली. १९७९ पूर्वी एक दिवसाचा शंकरपट दोन दिवसाचा करण्यात आला होता. अमृत महोत्सवी शंकरपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वसंतराव शिवणकर, रामकृष्ण घारपुरे, सम्मदभाई दामोधर शिवणकर, तुळशीराम तवाडे, गोमाजी शिवणकर, घनश्याम निनावे, ईस्तारी नवखरे, दौलत मडावी, प्रल्हाद तरोणे, गंगाराम नवखरे, लटारू नवखरे, कोलबा कोकोडे, महारू भाजीपाले, धनीराम शिवणकर, बळीराम शिवणकर, क्रिष्णा शिवणकर, नत्थू जिवतोडे, मारोती दोनोडे, रूळीराम कमाने, घनश्याम शिवणकर, रामकृष्ण दोनोडे, वामन तवाडे, हरीभाऊ दोनोेडे, तानाजी ढेंगे, जयवंत शेळके, गोविंदा नवखरे, गेंदलाल नवखरे, अविनाश कमाने, कृष्णा रोकडे यांनी अमृती महोत्सवी शंकरपट यशस्वी करून दाखविला.शंकरपटाला तुर्तास बंदी असल्यामुळे गावकऱ्यांनी सरपंच श्याम शिवणकर यांच्या नेतृत्वात जलसा उत्सव, कबड्डी व रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन केले आहे. मनोरंजनासाठी मराठमोठया लावणी व रेंगेपार कोहळी येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. पटाच्या दाणीवर कबड्डीचा फड रंगणार आहे.न्यायालयाने बंदी घातल्यामुळे दरवर्षी वसंतपंचमीला पार पडणाऱ्या शंकरपटाचे आयोजन करता आले नाही. गावकऱ्यांचा उत्साहावर विरजन पडले. शंकरपटाची सांस्कृतिक परंपरा जीवंत ठेवण्यासाठी जलसा, खुली कबड्डी व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन पटाचे दाणीवर करण्यात आले आहे. पुरूष व महिलांसाठी स्पर्धा आहेत. न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर शतकोत्तर शंकरपट साजरा करण्याचा मानस आहे.-श्याम शिवणकर, सरपंच, पिंपळगाव सडक़