तुमसर तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक पर्यटनस्थळ दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:37+5:30

उंच टेकडीवर चांदपूर येथे हनुमानाचे जागृत मंदिर आहे. बारा वर्षापूर्वी येथे पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या बंद पडल्या. लहान महादेव म्हणून गायमुखची ओळख संपूर्ण राज्यात आहे. निसर्गाच्या कुशीत गायमुख येथे महादेवाचे मंदिर आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे येतात. पर्यटनाच्या संधीही येथे उपलब्ध आहेत. परंतु अजूनपर्यंत विकासाच्या प्रतीक्षेत हे स्थळ आहे.

Historical and mythological tourist places in Tumsar taluka neglected | तुमसर तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक पर्यटनस्थळ दुर्लक्षित

तुमसर तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक पर्यटनस्थळ दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देनिधीची कमतरता : गायमुख व आंबागड उपक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु माडगी, चांदपूर, गायमुख व आंबागड येथील पर्यटनस्थळ विकासापासून दूर आहेत. निधीच्या अभावाने ऐतिहासिक, पौराणिक व निसर्गरम्यस्थळ उपेक्षित आहे.
तालुक्याला सातपुडा पर्वत रांगा लाभल्या आहेत. माडगी (दे) पौराणिक व निसर्गरम्य स्थळ वैनगंगा नदीपात्रात २०० फुट शिळेवर आहे. भगवान विरसिंह व नृसिंगाचे मंदिर येथे आहे. पौराणिक महत्व या मंदिराला आहे. गत शासनाने या मंदिरासाठी निधी मंजूर केला होता. परंतु तुटपूंज्या निधीत विकास कामे झाली नाही.
उंच टेकडीवर चांदपूर येथे हनुमानाचे जागृत मंदिर आहे. बारा वर्षापूर्वी येथे पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या बंद पडल्या. लहान महादेव म्हणून गायमुखची ओळख संपूर्ण राज्यात आहे. निसर्गाच्या कुशीत गायमुख येथे महादेवाचे मंदिर आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे येतात. पर्यटनाच्या संधीही येथे उपलब्ध आहेत. परंतु अजूनपर्यंत विकासाच्या प्रतीक्षेत हे स्थळ आहे.

आंबागड किल्ला उपेक्षित
आंबागड किल्ल्याचा मोठा रंजक इतिहास आहे. आंबागड गावाजवळ उंच टेकडीवर इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे. इतिहासाचे विद्यार्थी व पर्यटक येथे भेटी देतात. परंतु येथेही सोयी सुविधा उपलब्ध नाही. पुरातत्व विभागाचे येथे कायम दुर्लक्ष आहे. शासनाने वेळोवेळी निधी दिला. परंतु त्या निधीतून किल्ल्याची दुरुस्ती, किल्ल्यावर जाण्याकरिता पायऱ्या तयार करण्यात आल्या. इतर तुरळक कामे करण्यात आली.
 
Web Title: Historical and mythological tourist places in Tumsar taluka neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन