शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील हेमंत नंदनवार युपीएससी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 20:35 IST

मोहाडी येथील हेमंत रमेश नंदनवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून देशभरात त्याचा ८८२ वा क्रमांक आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी गौरवाची बाब

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी येथील हेमंत रमेश नंदनवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून देशभरात त्याचा ८८२ वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे तो सध्या उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे नाबार्डमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.मंगळवारी दुपारी युपीएससीचा निकाल घोषीत होताच हेमंतने लखनऊ येथून आपल्या कुटुंबियांना मोबाईलवरून युपीएससी (आयएएस) उत्तीर्ण झाल्याची आनंद वार्ता दिली. तो देशभरातून ८२२ रँकवर उत्तीर्ण झाला आहे.

त्याच्या कुटुंबात आई-बाबा, दोन मोठे भावंड आहेत. त्याच्या वडिलांचे मोहाडीतील बाजारपेठेत कापड विक्रीचे दुकान आहे. गावोगावी व शहरात कपडे विकून त्यांनी संसाराचा गाढा ओढला. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी कुंजनबाई यांचीही मोलाची साथ लाभली. संघर्षमय जीवनातून घडलेल्या हेमंतने शैक्षणिक वाटचालीत कधीही मागे वळून पाहिले नाही.

हेमंतने कठोर परिश्रम व मेहनतीतून युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे भ्रमणध्वनीहून सांगितले. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरातून हेमंतच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे यापूवीर्ही हेमंतने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची पूर्व तथा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र मुलाखतीत त्याला यश मिळाले नव्हते. त्याने यानंतर आयएएससाठी कठोर मेहनत घेतली व ती सिद्धीला नेली.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग