देव्हाडा ग्रामपंचायतीचा उपक्रम : प्रजासत्ताक दिनापासून सुरूवात करडी (पालोरा) : देव्हाडा ग्रामपंचायतीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामवासीयांसाठी नाविण्यपूर्ण योजनेची घोषणा केली आहे. अशी घोषणा करणारी ती जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गावात आकस्मिक घरांना आग लागल्यास, वीज पडून व सर्पदंशाने इसमांचा मृत्यू झाल्यास तत्काळ २००० रुपयांची मदत देण्याची घोषणा सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे यांनी केली आहे.देव्हाडा ग्रामपंचायत नाविण्यपूर्ण उपक्रमांसाठी मोहाडी तालुक्यात ओळखली जाते. मागील वर्षी सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर हा उपक्रम सुरु केला. उपक्रमात सहभागी कुटुंबांना प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये रोख बक्षिस व मानसन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला गेला. दि. १५ आॅगस्ट रोजी समारंभपूर्वक दिले जाणार आहे. उपक्रमास गावकरी वर्गाने तेवढ्याच दिलेरिने साथ दिली. गावात स्वच्छता अभियान या निमित्ताने राबविला गेला. परिसर स्वच्छ होण्याबरोबर गाव निरोगी राहण्यास यामुळे मदत झाली. गावकरी वर्गाने दिलेल्या सहकार्यानी प्रेरीत होवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रजासत्ताक दिनापासून आकस्मित घटनांसाठी गावकऱ्यांना मदत देण्याचा उपक्रम हाती घेतला. प्रजासत्ताक दिनी सरपंच वंदना पुराम व उपसरपंच महादेव फुसे यांनी या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमात गावातील एखाद्या घराला आग लागली, वीज व सर्पदंशाने कमावत्या इसमाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. ती हानी भरून निघणारी नसली तरी गाव या नात्याने तातडीची मदत व्हावी म्हणून त्यांनी प्रती व्यक्तयी २ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली.तरुणांना स्पर्धा परीक्षांची व वाचनाची सवय लागावी, या हेतूने ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत वाचनालय उघडण्यात आले. वाचन कक्ष, पिण्याचे पाणी, विद्युत व बसण्याची व्यवस्था करण्यात आली. वाचनालयात इतर साहित्याबरोबर स्पर्धा परीक्षांची पुस्तके, रेल्वे, एमपीएससी, युपीएससी, कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, रोजगार वार्ता आदी व अन्य संसाधनांची व्यवस्था करण्यात आली. वाचनालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजतापर्यंत ठेवण्यात आली असून शिपायाची तैनाती करण्यात आली आहे. यावेळी सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, ग्रामसेविका पी.एम. तभाने, संतोष साखरे, दुर्योधन बोंदरे, अरुण शेंडे, ममता लाळे, सुजाता वासनिक, यमू बोंदरे, रेखा धुर्वे, महेंद्र मेश्राम, धर्मवीर लाळे, अरविंद साखरे, मुकेश बुटके, तंमुस अध्यक्ष सुभाष बोंदरे, रामदास बोंदरे, विजय बंसोड व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
अकस्मात घटनांसाठी दोन हजार रुपयांची मदत
By admin | Updated: February 5, 2016 00:31 IST