शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र सर्व आर्थिक व्यवहाराचे अधिकार संबंधित प्रशासकांना देण्यात आले होते. या आदेशात त्यांनी आर्थिक अधिकाराचा कुठेही उल्लेख केला नव्हता. उलट विद्यमान सीईओंनी आता एक आदेश काढून सर्व आर्थिक अधिकार जिल्हा परिषदेकडे अर्थात स्वत:कडे घेतले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना कोणताही खर्च करावयाचा झाल्यास थेट जिल्हा परिषदेत जावून परवानगी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देसीईओंचे आदेश : विकास निधीसह कार्यालयीन खर्चासही घ्यावी लागेल जिल्हा परिषदेची परवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर नियुक्त प्रशासकांच्या आर्थिक अधिकारावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका आदेशाने टाच आणली आहे. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची पूर्व संमती घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे ३ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन सीईओंनी काढलेल्या आदेशात प्रशासकांना पूर्ण अधिकार दिले होते. मात्र विद्यमान सीईओंनी ८ जून रोजी आदेश काढून प्रशासकांच्या आर्थिक नळ्या आवळल्या आहे. कोरोना संसर्गामुळे येथे निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्ट २०२१ पूर्वी मुदत संपणाऱ्या १६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे या १६ ग्रामपंचायती भंडारा तालुक्यातील आहेत. याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांना सर्व अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत देण्यात आले आहे. मात्र आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी ८ जुलै राेजी एक आदेश निर्गमित केला. त्यात प्रशासन सुरळीतपणे पार पाडावे, मात्र आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची पूर्व संमती घ्यावे, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका तहकूब झाल्या होत्या. त्याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र सर्व आर्थिक व्यवहाराचे अधिकार संबंधित प्रशासकांना देण्यात आले होते. या आदेशात त्यांनी आर्थिक अधिकाराचा कुठेही उल्लेख केला नव्हता. उलट विद्यमान सीईओंनी आता एक आदेश काढून सर्व आर्थिक अधिकार जिल्हा परिषदेकडे अर्थात स्वत:कडे घेतले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना कोणताही खर्च करावयाचा झाल्यास थेट जिल्हा परिषदेत जावून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासक अशा परवागी घेण्याच्या भानगडीत पडण्या ऐवजी विकास कामांना ब्रेक लावण्याची शक्यात आधिक असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासकांना झिजवावे लागेल उंबरठे- जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींवर आरोग्य पर्यवेक्षक, शाखा अभियंता, कृषी विस्तार, शिक्षण विस्तार, पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाचाच ते एक घटक आहे. मात्र ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून गेल्यानंतर त्यांना आर्थिक परवानगीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे उंबरठे झिटवावे लागेल. विकास कामांचा खोळंबा- आता प्रशासकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे दिवाबत्ती, कार्यालय खर्च, १५वा वित्त आयोग, तांडा वस्ती सुधार योजना, नवबोद्ध वाड्या, वस्त्यांचा विकास यासह सामान्य निधी, ग्रामपंचायत कर्मचारी वेतन, सफाई कामगारांची मंजुरी यासह विविध कामांसाठी लागणारा पैसा वेळेवर मिळणार नाही त्यातून विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद