शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वजनमाप केंद्रावर रेतीचा प्रचंड साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:53 IST

सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष : लिलाव प्रक्रिया केव्हा राबविणार

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात. अतिरिक्त रेती ट्रकमधून कमी करण्यात येते. एका वजन काट्याबाहेर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.तुमसर-गोंदिया मार्गावर घाटकुरोडा रेती घाटावरुन रेती उत्खनन सुरु आहे. दररोज शेकडो ट्रक नागपुर येथे जातात. नदीघाटावरुन जवळच्या वजनमाप करणाऱ्या काट्यावर रेतीचे वजनमाप करण्यात येते. देव्हाडी- माडगी शिवारात वजनकाट्यावर रेती ट्रकची वजनमाप केले जाते. अतिरिक्त ट्रकमधील रेती काट्यावर कमी करण्यात येते. त्यामुळे येथे रेतीसाठा जमा झाला आहे.साठा झाल्यानंतर रेती महसूल प्रशासनाने पंचनामा करून रेती साठ्याचा लिलाव करण्याचा नियम आहे, परंतु येथे लिलाव नियमित केला जात नाही. तलाठी मंडळ अधिकाऱ्यांची गाव पातळीवर साखळी आहे.वजनमाप केंद्रावर रेतीसाठीबाबत माहिती तहसीलदारांना दिली जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.तुमसर - गोंदिया राज्यमार्गावर ही वजनमाप केंद्र आहेत. रेतीसाठा येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. महसूल कर्मचाऱ्यांचे लक्ष रेती साठ्याकडे जात नाही. पावसाळा सुरु झाला या दिवसात रेतीला प्रचंड मागणी असते. त्यामुळे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यातील अनेक ठिकाणी रेतीसाठा करून ठेवल्याची माहिती आहे. चारगाव, सुकळी, रेती घाटावरुन रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. परसवाडा मार्गाचे ही रेती ट्रक्टरने नेली जाते. सुकळी येथील नदीत मोठे खड्डे पडले आहेत. परसवाडा येथील ग्रामस्थांनी रेती ट्रक्टरला गावातून बंदी करण्याची तक्रार दिली आहे. मध्यरात्री पासून ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक सुरु आहे. या ट्रॅक्टरचालकांना कुणाचे पाठबळ आहे. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गौण खनिजाची तुमसर तालुक्यातून लुट येथे थांबविण्याची मागणी होत आहे. रेतीचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून येथे फोफावला आहे, हे विशेष. तुमसरात उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे, नियमावर बोट ठेऊन येथे काम केली जात असल्याचे सांगण्यात येते. अवैध रेती वाहतुक व रेती उत्खननाकडे येथे लक्ष दिले जात नाही.वजनमाप केंद्रावरील रेती साठ्याचा पंचनामा करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना तशी परवानगी मागितली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून रेती साठयाचा अहवाल मागवून तात्काळ कार्यवाही केली जाईल.- गजेंद्र बालपांडेतहसीलदार तुमसर

टॅग्स :sandवाळू