शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जिल्ह्यात दमदार पावसाने भात पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM

गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.

ठळक मुद्देसरासरी ४३ मीमी पावसाची नोंद : भंडारा आणि साकोली तालुक्यात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने धोक्यात आलेल्या भात पिकाला रविवारी झालेल्या दमदार पावसाने जीवदान मिळाले आहे. २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिमी पावसाची नोंद झाली असून भंडारा आणि साकोलीत अतिवृष्टी झाली. अवघ्या दोन तासात भंडारा शहरात १०४ मिमी पाऊस तर साकोलीत ७०.८ मिमी पाऊस कोसळला.गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे  पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.भंडारा तालुक्यात १०४ मिमी पाऊस अवघ्या दोन तासात कोसळला. तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी १२६०.८ असून १ जून ते ६ जुलैपर्यंत २७६.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी याच कालावधीत ३३२.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी या कालावधीत ४५०.८ मिमी म्हणजे १४३ टक्के पाऊस कोसळला. त्या खालोखाल साकोली तालुक्यात ७०.८ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ३१४.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. मोहाडी तालुक्यात गत २४ तासात २३ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २४८.७ मिमी म्हणजे सरासरीच्या ९० टक्के, तुमसर तालुक्यात २५.१ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २२३.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ८१ टक्के, पवनी तालुक्यात ५.४ टक्के पाऊस कोसळला असून आतापर्यंत ३३३.९ मिमी, लाखांदूर तालुक्यात ३९.२ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २८६.८ मिमी आणि लाखनी तालुक्यात ३९.८ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत ३८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या रखडल्या होत्या. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रोवणीचे काम करीत होते. परंतु पाऊस आल्याशिवाय रोवणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. धान उत्पादक शेतकºयांनी शेतात पऱ्ह्यांची नर्सरी टाकली होती. पऱ्हे रोवणीयोग्य झाले होते. परंतु पाऊस नसल्याने पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. अशा स्थितीत रविवारी झालेल्या पावसाने भात पिकाला जीवदान मिळाले आहे.भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने शेतशिवारात रोवणीच्या कामाला वेग आला असून शेतकरी आणि मजुरांनी शेतशिवार गजबजून गेले आहे.प्रकल्पांमध्ये २७ टक्के जलसाठाजिल्ह्यातील मध्यम, लघु आणि माजी मालगुजरी तलावांमध्ये सध्या २७.८३ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ १०.४२ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर प्रकल्पात २०.१० टक्के, बघेडा प्रकल्पात ५५.६१ टक्के, बेटेकर बोदली प्रकल्पात २०.०७ टक्के पाणी साठा आहे. चार मध्यम प्रकल्पात ९.०६३ दलघमी जलसाठा असून तो २१.१६ टक्के आहे. जिल्ह्यातील ३१ लघुप्रकल्पात २९.५१ टक्के जलसाठा आहे. सर्वाधिक जलसाठा तुमसर तालुक्यातील डोंगरला प्रकल्पात ७६.२६ टक्के आहे तर २८ माजी मालगुजारी तलावात सद्यस्थिती ३५.२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत तीन पट जलसाठा आहे. त्यामुळे सिंचणासाठी उपलब्ध होण्यास आगामी काळात अडचण जाणार नाही.रविवारी झालेल्या दमदार पावसानंतर दुसऱ्या दिवशीही दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पाऊस कोसळला. या पावसाने रस्ते निर्मनुष्य झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. रविवारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :agricultureशेती