शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जाेरदार पाऊस, गाेसेचे सर्व 33 दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा / माेहाडी : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. गाेसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ झाल्याने सर्व ३३ दरवाजे एक मीटर उघडण्यात आले. वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. माेहाडी तालुक्यात अतिवृष्टीची नाेंद झाली असून, अवघ्या तीन तासांत ६५ मिमी पाऊस काेसळला. अनेक घरांत पाणी शिरले असून धान शेतीही जलमय झाल्याचे चित्र आहे.गत दाेन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस काेसळत आहे. साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९.८ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यात पवनी तालुक्यात ६०.८ मिमी आणि भंडारा तालुक्यात ५२.१ मिमी पावसाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. माेहाडी तालुक्यात जाेरदार पाऊस बरसला. माेहाडी तालुक्यातील सीतेपार तलाव ओव्हरफ्लाे हाेऊन या तलावाचे पाणी धानाच्या शेतीत शिरले. तसेच अनेक गावांतील सकल भागातील घरात पाणी शिरले.गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारा शहरानजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पाणी पातळी स्थिर असून, सध्या कारधा येथे २४४.६७ मीटर पाणी असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला.

मोहाडीत घरांची पडझड- मोहाडी तालुक्यासह शहरात मंगळवारी सकाळी दोन तास मुसळधार बरसल्याने अनेक घरात पाणी शिरले तर काही घरांची पडझड झाली. दोन तासांत ६५ मिमीच्यावर पाऊस पडला. सखल भागात असलेल्या कुशारी फाटा चौकात जवळपास दोन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. वाहनांना जागेवरच उभे रहावे लागले. तहसील कार्यालयातही पाणी शिरले. तहसीलदारांनी तलाठ्यांची तातडीची बैठक बोलावून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. सीतेपार तलावाचे पाणी गावात शिरले तर हरदोली येथील तलावाच्या पारीला खिंडार पडले. मोहाडी, कान्हळगाव, हरदोली या गावांना पावसाचा मोठा फटका बसला. 

 

टॅग्स :RainपाऊसGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प