शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात येणार उष्णतेची तीव्र लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:57 IST

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहित होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून २६ ते २३ एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे२३ ते २६ एप्रिल हवामान खात्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहित होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून २६ ते २३ एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने चाळीशी पार केली असून तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियस वाढ होण्याचे संकेत आहे.अरबीसागर ते बंगालची खाडीपर्यंत गत १० दिवसात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वातावरण निर्माण होवून पावसाच्या सरी कोसळल्या. आता दाब कमी होवून वाऱ्याची गती संत झाली आहे. वातावरणात प्रतिकूल अशा प्रमाणात दाब निर्माण होवून तापमान वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात २३ ते २६ एप्रिल दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहीत होणार आहे. परिणामी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंशाच्या आसपास आहे. या उष्णतेच्या लाटेने त्यात दोन ते तीन अंश सेल्सियस वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे ४२ ते ४३ अंश सेल्सियस तापमान होण्याची शक्यता आहे.विदर्भातील उन्हाळा तसा प्रसिद्ध आहे. एप्रिल, मे महिन्यात तापमान प्रचंड वाढलेले असते. सूर्य आग ओकत असल्याने रस्ते भट्टीसारखे तापतात. या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होवून आरोग्याची समस्या निर्माण होते. आगामी तीन दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा.

टॅग्स :weatherहवामान