शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

गोपनीयता भंगप्रकरणी आरोग्य विभागाची धावाधाव

By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST

पहेला आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय ठेवण्यात येणारे बयान सार्वजनिक करण्यात आल्याचे वृत्त

भंडारा : पहेला आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय ठेवण्यात येणारे बयान सार्वजनिक करण्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये आज प्रकाशित होताच आरोग्य विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ माजली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गोपनीयता भंग प्रकरणी ते कोणता निर्णय घेतात, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या दवडीपार उपकेंद्रातील कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत हजारो रुपयांची लस वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता कविश्वर यांच्या भेटी दरम्यान आढळली. सदर लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. सदर प्रकरण गंभीर असल्याने डॉ. कविश्वर यांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. त्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात आली. तीनदा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले. नोंदविलेले बयान नियमानुसार गोपणीय ठेवले जातात. मात्र हे बयान आरोग्य केंद्राच्या इ-मेलवर पाठविण्यात आले. त्यामुळे ती माहिती सार्वजनिक झाली. याची तक्रार जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र गोपनीयता भंगप्रकरणी अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. गोपनीय माहिती झाली सार्वजनिक या शिर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच जिल्हा प्रशासन हादरले. आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. सकाळपासून पहेला आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद आरोग्य विभागात एकच धावपळ दिसून आली. आज पालकमंत्री डॉ.दिपक सावंत जिल्ह्यात असल्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र त्यांना या संबंधी माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. पहेला येथील आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी, अधिकारी वेळेवर हजर झाले होते. केंद्रासह आवाराची साफसफाई केल्याचे दिसून आले. कर्मचारी गणवेशात दिसून आले. आज दिवसभर या विषयावरून चर्चा रंगलेली होती. जिल्हा परिषदमध्ये आयोजित बैठक आटोपल्यानंतर चौकशी समितीतील अधिकारी आरोग्य विभागाच्या कक्षात दाखल झाले होते. गोपनीयता भंग प्रकरणी त्यांना पाचारण करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या अहवालावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या ७ दिवसात कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण सार्वजनिक करणे चुकीचे आहे. याप्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांकडून मागून स्वत: या प्रकरणाकडे लक्ष घालणार आहे. - डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री, भंडारापहेला येथील प्रकरणाची माहिती वृत्तपत्रातून कळली. या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालणार आहे. याविषयी आरोग्य विभागाकडून माहिती घेता येईल. - धीरजकुमार जिल्हाधिकारी, भंडाराबयान गोपीनीयता प्रकरणी मला माहिती नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकीमुळे आज सकाळपासून व्यस्त कार्यक्रम होते. उद्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लक्ष घालणार आहे.- राजेंद्र निंबाळकर मुख्य कार्यपालन अधिकारी, भंडारा