शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

कोरोनाबाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ व्हायला लागली. जिल्ह्यातील तब्बल ७०० गावांमध्ये कोरोनाने विळखा घातला. यामुळे रुग्णांसह नातेवाईकही भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत गत आठवडाभरापासून दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार व्यक्ती कोरोनावर यशस्वी मात करीत आहेत, तर १००० ते १२०० नवे रुग्ण दाखल होत आहेत.

ठळक मुद्देदिलासादायक : सात दिवसात सुमारे ९ हजार कोरोनामुक्त, ३३ हजार १८६ जणांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी गत आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात सात दिवसात ८ हजार ७९५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ७ हजार ५९८ नवे रुग्ण आढळून आले. पाॅझिटिव्हिटीची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ व्हायला लागली. जिल्ह्यातील तब्बल ७०० गावांमध्ये कोरोनाने विळखा घातला. यामुळे रुग्णांसह नातेवाईकही भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत गत आठवडाभरापासून दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार व्यक्ती कोरोनावर यशस्वी मात करीत आहेत, तर १००० ते १२०० नवे रुग्ण दाखल होत आहेत. त्यातही केवळ १०० ते दीडशे रुग्णांनाच रुग्णालयात उपचाराची गरज असते. इतर रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करीत असली तरी वाढती रुग्णसंख्या आणि त्यातून वाढणारा ताण यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार होत नसल्याची ओरड आहे. परंतु अलीकडे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह इतर उपचारांची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गत आठवडाभरात जिल्ह्यासाठी दिलासादायक असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याची खरी गरज आहे. मात्र आजही नागरिक रस्त्यावर दिसतात. 

जिल्ह्यात १२३८ कोरोनामुक्त, १३६८ नवे रुग्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी १२३८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर १३६८ नवीन रुग्ण आढळून आले. २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यात रविवारी ४७८५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ६७७, मोहाडी ९५, तुमसर १२९, पवनी ९६, लाखनी १४३, साकोली १५८ आणि लाखांदूर तालुक्यात ७० असे १३६८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १५ हजार ५३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४५ हजार ३२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले तर ३३ हजार १८६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली.  जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ७१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी भंडारा तालुक्यात १४, तुमसर २, पवनी ३, साकोली १ आणि लाखांदूर तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११ हजार ४१९ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात ५४५२, मोहाडी ७१७, तुमसर १३२५, पवनी ९०३, लाखनी १२९१, साकोली ११४१ आणि लाखांदूर तालुक्यातील ५९० व्यक्तींचा समावेश आहे. 

सर्वाधिक भंडारा तालुक्यातील रुग्ण बरे जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार १८६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यात सर्वाधिक १३ हजार ८९८ व्यक्ती भंडारा तालुक्यात कोरोनामुक्त झाले आहेत. मोहाडी तालुक्यात २८४२, तुमसर ४१७५, पवनी ३९६५, लाखनी ३५४४, साकोली ३१२६ आणि लाखांदूर १६३६ रुग्णांचा समावेश आहे.

३० ते ६० वयोगटात बाधितांचे प्रमाण अधिक जिल्ह्यात वयोगटानुसार कोरोना बाधितांची आकडेवारी बघितल्यास ३० ते ६० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. २१ ते ३० वयोगटात ८९६०, ३१ ते ४० वयोगटात ९२७९, ४१ ते ५० वयोगटात ८१७४, ५१ ते ६० वयोगटात ६८२५ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. ० ते १० वयोगटात १४७२, ११ ते २० वयोगटात ४०७०, तर ७१ ते ८० वयोगटात १११९ आणि ८० वर्षांवरील २५४ रुग्णांचा समावेश आहे.पुरुषांपेक्षा बाधित होण्याचे महिलांचे प्रमाण कमी जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ९५३ व्यक्तिंना कोरोनाची लागण झाली आहे. यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. २५ हजार ६७२ पुरुष आणि १८ हजार २८१ महिलांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. पुरुषांचे बाधित होण्याचे प्रमाण ५८.४१ टक्के, तर महिलांचे ४१.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे ४३ हजार ९५३ रुग्णांपैकी आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. पुरुषांपेक्षा बाधित होणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या