शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:09 IST

शाळा सिद्धी प्रशिक्षणासाठी मोहरणा येथून भंडाराकडे येणाऱ्या मुख्याध्यापकाच्या दुचाकीला विरूद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देकारधा पथकर नाक्याजवळील घटना : दुचाकीवरील दुसरे मुख्याध्यापक गंभीर जखमी

ऑनलाईन लोकमतभंडारा : शाळा सिद्धी प्रशिक्षणासाठी मोहरणा येथून भंडाराकडे येणाऱ्या मुख्याध्यापकाच्या दुचाकीला विरूद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात एका मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीच्या मागे बसलेल्या दुसऱ्या मुख्याध्यापकांना गंभीररीत्या दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीयम महामार्गावरील कारधा पुलाजवळील पथकर नाक्याजवळ घडली.रवींद्र शामराव ढोके (५७) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव असून टिकाराम गणपत ठाकरे असे गंभीररित्या जखमी मुख्याध्यापकाचे नाव आहे. रविंद्र ढोके हे लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक होते.भंडारा जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात शाळा सिध्दी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन गुरुवारला करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापक ढोके हे बेलाटी येथील गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक टिकाराम ठाकरे यांच्यासोबत दुचाकीने येत होते. दरम्यान भंडारा शहरालगतच्या कारधा टोलनाक्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला विरूद्ध दिशेने जाणाºया भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात ढोके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात ठाकरे हे गंभीररित्या जखमी झाले. ठाकरे यांना गंभीर अवस्थेत भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हे दाखल केले असून तपास उपनिरीक्षक नान्हे हे करीत आहेत.परीक्षा काळात शिक्षण विभागाचे प्रशिक्षणशाळा सिद्धी प्रशिक्षण कार्यशाळा भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात गुरुवारला १०.३० ते ५.३० पर्यंत आयोजित करण्यात आले होते. परीक्षांचे सत्र सुरू असल्यामुळे मुख्याध्यापक दहावी व बारावीच्या परीक्षेत व्यस्त आहेत. त्यात काही समीक्षक, काही परिक्षक, काही केंद्रसंचालक, उपकेंद्रचालक ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या कामात मुख्याध्यापक व्यस्त आहे. शिक्षण विभागाने परीक्षा कालावधीत मुख्याध्यापकांसाठी प्रशिक्षण ठेवणे गैरसोयीचे होते, असा सूर शिक्षक वर्गांमध्ये उमटत आहे. दरम्यान, प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ मार्गदर्शक हे कार्यशाळा अनिवार्य असल्याचे सांगून ७.३० वाजतापर्यंत कुणालाही प्रशिक्षणातून जाता येणार नाही, अशी तंबी मुख्याध्यापकांना देण्यात आल्यामुळे यात सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांची तारांबळ उडत होती. प्रशिक्षणाचा भार मुख्याध्यापकावर आणून ताणतणावात ठेवण्यात आल्याचा आरोप आता समाजमाध्यमातून समोर आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात