लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उघड्यावर शौचास गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारना शेतशिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.राजू गोविंदा मानकर (४०) रा. जेवनाळा असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी राजू मानकर व त्याचा मित्र सुखराम मानकर हे दोघेही मचारना शिवारातील नाल्यावर मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे पाहण्यासाठी गेले. त्यावेळी राजू शौचास गेला. एका झुडपात लपून असलेल्या अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढविला. यात राजूच्या हाताला व डोळ्याचा वर गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. अस्वलाच्या हल्ल्याने घाबरलेल्या राजूने आरडाओरड केला तर त्याचा मित्र सुखराम जीव वाचविण्यासाठी झाडावर चढला. आरडोओरडा झाल्याने अस्वल आपल्या दोन पिल्ल्यासंह निघून गेली.या घटनेची माहिती मोबाईलवरुन गावकऱ्यांना देण्यात आली. गावकºयांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला त्वरित पालांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉ. नाकाडे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून रुग्णालयातही नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती ठाणेदार अंबादास सुनगर व वनक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली.याप्रकाराने गावकºयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतशिवारात जाण्याचे टाळावे, असे किटाडीचे वनक्षेत्रधिकारी हमीद शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:50 IST
उघड्यावर शौचास गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारना शेतशिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी
ठळक मुद्देमचारणाची घटना : रुग्णालयात उपचार