शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘तो’ पूल वाहतुकीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

सदर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दरवर्षीच पावसाळा आला की, पुलावरील डांबर उखडले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी शासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उचल होते. मात्र काम प्रत्यक्षात दिसत नाही. यावर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी करू हे धोरणच बांधकाम विभाग राबवित असल्याने नागरिक संतापले आहेत. आज घडीला माडगी पुलावर एक दोन नव्हे मोठे खड्डे पडून माडगी पुलाची चाळण झाली आहे.

ठळक मुद्देचालकांमध्ये अपघाताची भीती : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्र असलेल्या माडगी येथील मोठ्या पुलावर खड्डे पडल्याने पुलावरून जाताना दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे बांधकाम काही दशकांपूर्वी करण्यात आले खरे मात्र त्या पुलाच्या देखरेखीअभावी पुलाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी पुलावरून जाताना दुचाकी चालकांना जीव धोक्यात घालून जावे लागते. येथे अनेकदा या ठिकाणी अपघातही झाले आहेत. सुदैवाने पुलावर कठडे आहेत मात्र अतिवेगाने येणारे वाहन एखाद्या वेळी पुलाचे कठडे तोडून वाहनासह वाहनचालकांना जलसमाधी मिळू शकते. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असतांना देखील सार्वजनिक विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याने नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे.तुमसर- गोंदिया- रामटेक- नागपूर - गोंदिया महामार्गावरील वैनगंगा नदीवर माडगी येथे दळणवळणाच्या साधनासाठी वैनगंगा नदीवर मोठया पुलाची निर्मिती करण्यात आली आहे.सदर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दरवर्षीच पावसाळा आला की, पुलावरील डांबर उखडले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी शासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उचल होते. मात्र काम प्रत्यक्षात दिसत नाही. यावर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी करू हे धोरणच बांधकाम विभाग राबवित असल्याने नागरिक संतापले आहेत. आज घडीला माडगी पुलावर एक दोन नव्हे मोठे खड्डे पडून माडगी पुलाची चाळण झाली आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नाहित. त्यामुळे वाहन चालक या खड्ड्यातून वाहन नेताच वाहनाचे नियंत्रण सुटण्याची भिती व्यक्तहोत आहे. चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटत असल्याने अनेकदा वाहन पुलावरील कठड्यावर आदळले. अनेकदा वाहनाचा वेग कमी असल्यामुळे बरेचदा वाहने जागेवरच बंद पडतात. एखादया वेळेस तरी वाहन धारकांची होणारी कसरत पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची गरज आहे.पुलावरील कठडे तोडून वाहनासह चालक नदीत कोसळण्याची भिती आहे. भरदिवसा अशी परिस्थिती येत असल्याने रात्रीचा विचार न केलेलाच बराअसे वाहनधारकांनी सांगितले. तुमसर-गोंदिया मार्गावर तिरोडा येथे विद्युत प्रकल्प आहे तर देव्हाडी येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. याचमार्गावरून मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने या मार्गावर दिवस रात्र वाहनांची नेहमीच वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद असून याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.माडगी येथील पुलावरून प्रवास करताना एखाद्या दिवशी अपघात होत नाही असा कोणताच दिवस उगवला नाही. अनेक निवेदने देण्यात आली मात्र याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.परिस्थितीची गंभीरता लक्षात घेवून बांधकाम मंत्र्यांना निवेदन दिले आहे.- गौरीशंकर मोटघरे,महासचिव जिल्हा काँग्रेस

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा